National Youth Day : तरूणांनी राजकारणात यावं, घराणेशाहीपासून दूर रहावं – युवा संसदेत PM मोदींनी सांगितल्या ‘या’ 10 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi) यांनी राष्ट्रीय युवा दिनी मंगळवारी दुसर्‍या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समापन समारंभाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, जो समाज संकटातही प्रगतीचा मार्ग बनविणे शिकतो, तो समाज आपले भविष्य स्वतः लिहितो. म्हणूनच आज भारत आणि 130 कोटी भारतीय स्वतःचे सर्वोत्तम भविष्य घडवत आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान म्हणाले की, स्वामीजी म्हणायचे की, जुन्या धर्माच्या म्हणण्यानुसार नास्तिक तो असतो जो देवावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु नवीन धर्मानुसार नास्तिक तो आहे जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही.

राष्ट्रीय युवा संसदेच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही आधुनिक शिक्षण, चांगल्या संधींसह देशात अशी परिसंस्था विकसित करीत आहोत, ज्यासाठी तरुणांना परदेशात जावे लागत होते. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आमच्या राजकारणाला तरुणांची गरज आहे, सकारात्मक परिवर्तनासाठी राजकारण हे विधायक माध्यम आहे. दरम्यान, राजकीय राजवंश हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याला मुळापासून मिटवले पाहिजे. कारण, राजकीय घराण्यात कधीही ‘देश पहिला’ नसतो, त्यांच्यासाठी सर्व काही ‘मी आणि माझे कुटुंब’ आहे. पंतप्रधान म्हणाले की, लोक आता प्रामाणिकपणाने आणि कामाला पाठिंबा देत आहेत, परंतु राजकीय घराण्याचा आजार पूर्णपणे मिटलेला नाही.

पंतप्रधान म्हणाले की, लोक स्वामीजींच्या प्रभावाखाली येतात, संस्था बनवतात, त्यानंतर स्वामीजींनी दाखविलेल्या मार्गावर लोक त्या संस्थांमधून बाहेर पडतात आणि नव्या लोकांना जोडत राहतात. स्वामी विवेकानंदांनी आणखी एक अनमोल भेट दिली आहे. ती म्हणजे व्यक्ती निर्माण करणे, संस्था निर्माण करणे. याबद्दल क्वचितच चर्चा केली जाते. स्वामींनीच त्यावेळी म्हटले होते की, निर्भिड, स्पष्ट, स्वच्छ व निष्ठावान, धैर्यवान आणि महत्वाकांक्षी तरुण हाच देशाचा भविष्यकाळ बांधणारा पाया आहे. त्यांचा तरुणांवर आणि युवा सामर्थ्यावर खूप विश्वास होता.

पंतप्रधान म्हणाले की, आज एक असे पर्यावरण आणि इकोसिस्टिम तयार केले जात आहे तंत्र तयार केले जात आहे, जेणेकरुन आपले तरुण त्यांच्या कौशल्यानुसार आणि स्वप्नांनुसार स्वत: चा विकास करु शकतील. शिक्षण व्यवस्था असो, सामाजिक व्यवस्था असो वा कायदेशीर बारकावे या सर्व गोष्टी केंद्रस्थानी ठेवल्या जात आहेत. नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वी देशात अशी समजूत होती की जर एखादा तरुण राजकारणाकडे वळला तर घरातील लोक म्हणत होते की, मूल खराब होत आहे कारण राजकारण म्हणजे भांडण, त्रास, दरोडा, भ्रष्टाचार. लोक म्हणायचे की प्रत्येक गोष्ट बदलू शकते पण राजकारण बदलू शकत नाही. पीएम मोदी म्हणाले की, जे संकटांतूनही प्रगती साधण्यास शिकतात, तो समाज स्वतःचे भविष्य लिहितो, जे. म्हणूनच आज भारत आणि 130 कोटी भारतीय स्वतःचे सर्वोत्तम भविष्य घडवत आहेत.