भारताचे ‘सामर्थ्य’ पाहून आज अनेकांना आश्चर्य वाटतंय : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची प्रतिभा ही जागतिक ओळख आहे आणि भारत सर्वांसमोर आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करत आहे. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत. असे प्रतिपादन बहारीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारतीय नागरिकांसमोर बोलताना मोदी म्हणाले भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे लक्ष आहे. अर्थव्यवस्था वाढली तर प्रत्येक भारतीयांचे उत्पन्न वाढणार आहे. इन्फ्रास्ट्रक्टचरचे जाळे विणण्याचे काम सध्या भारतात सुरु आहे, पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहचण्याची भारतामध्ये क्षमता आहे आणि तसा प्लॅनही आहे असे मोदी यावेळी बोलताना म्हणाले. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट आहे तसेच देशात ५० कोटी लोकांनी मोफत आरोग्य विषयक उपचार मिळतात त्यामुळे नागरिकांचाही आत्मविश्वास उंचावलेला आहे.

बहारीनमध्ये भारतीयांनी स्वतःच्या मेहनतीने आपली जागा बनवली आहे. येथील सत्ताधारी ज्यावेळी भारतीयांचे कौतुक करतात त्यावेळी तुमचा अभिमान वाटतो तसेच येथे येणार मी पहिला पंतप्रधान ठरलो असे मोदी यावेळी म्हणाले. यावेळी अरुण जेटली यांच्याबद्दल बोलताना मोदी काहीसे भावुक झालेले दिसले त्यांनी भाषणाच्या शेवटी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहीली.

आरोग्यविषयक वृत्त –