PM Narendra Modi | ‘ठाकरेंनीच महाराष्ट्रात युती तोडली, भाजपने नाही’; पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

नवी दिल्ली : PM Narendra Modi | महाराष्ट्रातील (Maharashtra) युती ठाकरेंनी तोडली, भाजपने नव्हे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत (NDA Meeting) मोठे वक्तव्य केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला एनडीए म्हणून काम करायचे आहे, काँग्रेसप्रमाणे (Congress) भाजप (BJP) अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी बैठकीत संबोधित करताना दिला.

यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee), शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची (PM) संधी मिळाली नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले, असे म्हणत एनडीए बैठकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या अहंकारी उदाहरणांचा दाखला दिला आहे.

पुढे ते म्हणाले, शिवसेना (Shivsena) भाजपसोबत सत्तेत होती, त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची.
कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले.
तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे, आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे. या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? बिहारमध्ये (Bihar) कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद (CM) देण्यात आले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे ही मोदी म्हणाले.

राजस्थानमधील (Rajasthan) कोणत्याही सरकारची स्थिती आता इतकी वाईट नाही.
भारताच्या विकासासाठी राजस्थानची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे.
राजस्थानची निवडणूक (Rajasthan Election) जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | शरद पवारांविषयी आदर, म्हणून राष्ट्रवादी पक्ष फोडला का?; राऊतांची मोदींवर खोचक टीका

Prof. Hari Narke Passed Away | ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन