PM आणि बॉलिवूडच्या स्टार्संनी गुरू पोर्णिमेनिमित्त दिल्या शुभेच्छा ! मोदी म्हणाले गुरू जीवन सार्थक बनवतात तर जगात गुरूपेक्षा कोणीही मोठा नसल्याचं ‘बिग बीं’नी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी ट्विट करत सर्वांनाच गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

पीएम मोदींनी ट्विट केलंय की, “आज पवित्र दिवस आहे. गुरू आपल्या जीवनाला अर्थ प्रदान करतो. गुरू पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.” यावेळी त्यांनी गुरूंचे आभारही मानले आहेत.

अमिताभनं शेअर केला गुरू चरणांचा फोटो

77 वर्षीय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या निमित्तानं गुरुच्या चरणी फूल वाहतानाची इमेज शेअर करत ट्विट केलं की, मोठ्यांचा आणि वडिधाऱ्यांचा आशीर्वाद कायमच सोबत राहिल.”

बिग बींनी आणखी एक ट्विट करत कबीर दासांचा दोहा शेअर केला आहे आणि गुरूची महती सांगितली आहे. तिन्ही लोकात गुरूपेक्षा मोठं कुणीच नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

शिक्षकांचा आशीर्वाद आणि मारामुळं बनले अनुपम खेर

अनुपम खेर यांनी ट्विट केलंय की, “शिक्षकांना माझा सेल्युट. त्यांचा आशीर्वाद, प्रेम, रागावणं, मारणं यामुळंच आज मी इथं आहे.”

उर्मिला आत्म्याला मानते सर्वात मोठा गुरू

स्वामी विवेकानंद यांचा फोटो शेअर करत उर्मिलानं ट्विट केलं की, “शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळंच मी आज माझ्या विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. सर्वात मोठं परिवर्तन तेव्हा होतं जेव्हा आत्माच आपला मोठा गुरू बनतो. तुमचा आत्मा तुमच्या जीवनपथाला प्रकाशमान करण्यापासून कधीच चुकत नाही.

आषाढ पौर्णिमेला मानतात गुरू पौर्णिमा

हिंदू धर्मातील आषाढ पौर्णिमेला गुरू पौर्णिमा मानलं जातं. हिंदूंसोबतच जैन आणि बौद्ध धर्मीय देखील या दिवसाला मोठ्या श्रद्धेनं मानतात. या दिवशी गुरूचे आभार मानले जातात. गुरूची महती सांगितली जाते.