बांगलादेश PM शेख हसीना यांच्याशी पंतप्रधान मोदींची व्हर्च्युअल मीटिंग आज, रेल्वे नेटवर्क सुरळीत करण्यावर असेल जोर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आपल्या बांगलादेश समकक्ष शेख हसीना यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भेट घेतील. ही भेट विजय दिनाच्या एक दिवसानंतर होत आहे, जो 1971 मध्ये पाकिस्तानवर भारताच्या विजयाची आठवण करू देतो. या भेटीत कोविड-19 नंतर द्विपक्षीय संबंध मजबूत बनवण्यासोबतच 1965 पासून सुरू असणारे रेल्वे नेटवर्क पुन्हा सुरळीत करण्याबाबत चर्चा होऊ शकते.

भारत आणि बांगलादेशमध्ये सतत उच्चस्तरावर संपर्क सुरू आहे. या अंतर्गत 2019 च्या ऑक्टोबर महिन्यात बांगलदेशच्या पीएम शेख हसीना यांनी भारताचा दौरा केला होता. तर पीएम मोदींनी मार्च 2020 मध्ये मुजीब बोर्षो (वर्ष) च्या ऐतिहासिक निमित्ताने एक व्हिडिओ संदेश सुद्धा जारी केला होता. दोन्ही देशााचे नेते कोरोना महामारीच्या काळात सतत संपर्कात आहेत.

सूत्रांनुसार, भारत आणि बांगलादेश ट्रान्सपोर्ट आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर चर्चा होऊ शकते. दोन्ही नेते 1965 पासून सुरू असलेल्या 6 रेल्वे लिंकचे संचालन पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने आहेत.

हल्दीबाडी-चिलाहटी रेल्वे लिंकच्या उद्घाटनासह दोन्ही देशांमध्ये सध्या या 6 पैकी 5 रेल्वेंचे संचलन सुरू आहे. पश्चिम बंगालला बांगलादेशला जोणारे 4 अन्य रेल्वे लिंक अशाप्रकारे आहेत – पेट्रापोल (भारत)-बेनापोल (बांगलादेश), गेडे (भारत)-दर्शना (बांगलादेश), सिंहाबाद (भारत)-रोहनपुर (बांगलादेश) आणि राधिकापुर (भारत)-बिरोल (बांगलादेश).

सूत्रांनी सांगितले की, हल्दीबाडी-चिलहाटी रेल्वे लिंक 1965मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धामुळे उध्वस्त झाला होता. आता हा रेल्वे लिंक आसाम आणि बंगालला बांगलादेशाशी थेट जोडेल. याशिवाय अगरतळा आणि अखोराला जोडण्यासाठी सुद्धा रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे.