रशिया भारतात बनवणार रायफल – मिसाइल सिस्टीम, पुतिनच्या घोषणेवर मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदी रशियातील व्लादिवोस्तोक या शहरात पोहोचले असून त्यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा देखील झाल्या. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बोलताना म्हटले कि, भारताबरोबर आज संरक्षण, व्यापार, ऊर्जा तसेच आर्थिक क्षेत्रात अनेक करार झाले. त्याचबरोबर अनेक भारतीय कंपन्यांचे मी रशियात स्वागत करतो. भारतासोबत आमचे चांगले संबंध असून पुढे जाऊन आम्ही भारतात रायफल आणि मिसाईल सिस्टीमवर काम करणार आहोत.

पुतीन यांनी केली मोदींचे कौतुक
यावेळी पुतीन यांनी भाषणात पंतप्रधान मोदींचे कौतुक देखील केले. यावेळी कौतुक करताना ते म्हणाले कि, तुमच्यासारख्या मित्राचे स्वागत करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. भारत आणि रशियाचे संबंध हे खूप खास आहेत. मी नेहमी मोदींच्या संपर्कात असतो. विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी मी चर्चा करत असतो. त्यामुळे यापुढे देखील विविध मुद्द्यांवर आम्ही एकमेकांना मदत करू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मिळणार रशियाचा सर्वोत्तम पुरस्कार
या दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही घोषणा केली ही मला रशियातील सर्वोच्च नागरिक म्हणजेच ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टलने सन्मानित करण्यात येईल. यासाठी मी तुमचा आणि रशियातील लोकांचा आभारी आहे. हे आपल्या दोन देशातील मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हा भारतातील 130 कोटी लोकांचा सन्मान आहे. या पुरस्काराची घोषणा या वर्षाच्या एप्रिलमध्ये करण्यात आली होती.

रशिया भारताचा विश्वासू मित्र-
मोदी म्हणाले की रशिया भारताचा विश्वासू मित्र आहे. तुम्ही आमच्या विशेष आणि विशेषाधिकारिक नीतिवर लक्ष केंद्रीत केले . मी अनेक मुद्यावर तुमच्याशी फोनवर चर्चा केली, मला तुमच्याशी बोलताना कोणतीही समस्या जाणवली नाही.

दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या चर्चेत देखील पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात विविध विषयांवर करार होणार आहेत. त्याचबरोबर काश्मीर मुद्द्यावर देखील या दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.