COVID-19 : PM मोदींनी साधला पत्रकारांशी संवाद, म्हणाले – ‘तुम्ही शौर्य दाखवले, ही राष्ट्रसेवा’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात वाढत्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी लढण्यासाठी मोदी सरकार शक्य होईल ते पाऊल उचलत आहे. लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले गेले आहे. अशात आणीबाणी सेवा देणारे लोकं आपले काम कोणतीही भीती न बाळगता करत आहेत. यात मीडियाही सहभागी आहे. यादरम्यान पीएम नरेंद्र मोदींनी सोमवारी मोडियाशी संवाद साधला. यादरम्यान मीडियाच्या योगदानाचे आभार मानले. ते म्हणाले, ‘तुम्ही लोकांनी खूप शौर्य आणि धैर्याचे काम केले आहे. ही खरोखरच राष्ट्रसेवा आहे.’

‘आपला आत्मविश्वास उन्नत राहिला पाहिजे’
मोदींनी यादरम्यान म्हटले, ‘आपल्यासाठी पुढे अजून मोठी लढाई आहे. यासाठी सोशल डिस्टंसिंग खूप गरजेचे तेच. तुम्हाला माहित आहे कि कसा संवाद साधायचा आहे. लोकांना घरात राहण्याचा संदेश वेगाने पसरवा. जपान आणि दक्षिण कोरियाने अनुशासन करत यावर नियंत्रण आणले आहे.’ पुढे मोदी म्हणाले, ‘या लढाईत भीती आणि निराशेचे कोणतेही स्थान नाही. आपला आत्मविश्वास उन्नत राहिला पाहिजे.’

‘सोशल डिस्टंसिंगने युद्ध जिंकू शकतो’
मोदी म्हणाले, ‘आपल्याला मेडिकल किंवा आरोग्य सेवा करत असलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. ते निस्वार्थीपणे आपले आयुष्य धोक्यात टाकून लोकांसाठी काम करत आहेत.’ ते म्हणाले की, ‘जगातील मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशाही या परिस्थितीला सांभाळू शकत नाहीयेत. या धोक्याला फक्त संसाधनांद्वारेच जिंकता येईल. याला सोशल डिस्टंसिंगमुळे पराभूत करू शकतो.’