काँग्रेसला मला मारण्याची स्वप्ने पडत आहेत : नरेंद्र मोदी 

इटारसी : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदींची काँग्रेसवाल्‍यांना एवढी नफरत झाली आहे की, मोदींना मारण्याची स्वप्ने त्यांना पडत आहेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील इटारसी येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

येत्या  ६ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्य प्रदेश मधील इटारसी येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष घराणेशाही रुजवण्याचे आणि भ्रष्टाचाराचे काम प्रामाणिकपणे करत असून, इतर बाबतीत हा पक्ष अप्रामाणिक आहे. भाजप देशाच्या सर्वागीण विकासासाठी काम करत आहे. परंतु, घराणेशाहीतील नव्या पिढीच्या प्रगतीसाठी काम करत आहे. तसेच दिग्विजय सिंह यांनी इस्लाम धर्मप्रचारक झाकीर नाईकला खांद्यावर उचलून नृत्य केले. काँग्रेस सरकारने त्यांना दहशतवादाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. नाईकना शांततादूत ठरविण्याचे प्रयत्न आधीच्या सरकारांनी केले. आसा आरोपही त्यांनी केला.

त्‍यांना जम्‍मू आणि काश्मीरसाठी स्‍वतंत्र पंतप्रधान हवा आहे. अशी टीकाही त्यांनी केली. इतकेच नव्हे तर, काँग्रेसवाल्‍यांना मोदींची एवढी नफरत झाली आहे की, त्यांना मोदींना मारण्याची स्‍पप्ने पडत आहेत. परंतु, संपूर्ण भारत मोदींच्या बाजुने बॅटिंग करत आहे हे काँग्रेसवाले विसरले आहेत. असेही त्यांनी म्हंटले.