67 व्या Mann Ki Baat कार्यक्रमासाठी PM मोदींनी मागवलं देशाचं मत, ‘या’ पध्दतीनं सुचित करण्याचं ट्विट करून केलं आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जुलै रोजी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित करतील. पंतप्रधान मोदींचा हा ६७ वा मन की बात कार्यक्रम असेल. या महिन्यात होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाच्या विषयासाठी स्वत: पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. या कार्यक्रमासाठी कोणतीही व्यक्ती आपल्या कल्पना आणि सूचना देऊ शकते, त्यातील निवडक विषयांचा समावेश पंतप्रधान मोदी त्यांच्या कार्यक्रमात करतील.

पीएम मोदींनी मागितली देशवासियांकडून सूचना
देशातील जनतेचे मत जाणून घेत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, “मला खात्री आहे की सामूहिक प्रयत्नांमधून सकारात्मक प्रेरणा घेण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. आपणास नक्कीच त्या उपक्रमांबद्दल माहिती असेल ज्यामुळे अनेकांचे जीवन बदलले आहे. कृपया या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी त्यांना सामायिक करा. या कार्यक्रमाची तारीख २६ जुलै आहे.

असे पाठवू शकता इनपुट
एवढेच नव्हे तर पंतप्रधान मोदींनी आपल्या कल्पना व सूचना त्यांच्यापर्यंत पोहचवू शकतात हे देखील लोकांना सांगितले. पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “मन की बात’साठी कल्पना देण्याचे बरेच मार्ग आहेत. आपला संदेश १८००-११-७८०० वर कॉल करून रेकॉर्ड करा. खास तयार केलेले ओपन फोरम NaMo App वर आपले इनपुट शेअर करा.”

२६ जुलै रोजी होणार्‍या मन की बात कार्यक्रमात आपले इनपुट पाठवण्याची शेवटची तारीख २५ जुलै आहे. पीएम मोदींनी रेडिओ कार्यक्रमासाठी लोकांची मते विचारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पीएम मोदींनी अनेकदा ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी देशवासियांकडून त्यांचे मत विचारले आहे.

यापूर्वी पंतप्रधान मोदींचा ६६ वा मन की बात कार्यक्रम २८ जून रोजी झाला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरस आणि पूर्व लडाखमधील लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) भारत-चीन सीमा विवाद आणि गलवान खोऱ्यातील हिंसाचाराबद्दल चर्चा केली होती.