PM मोदींंच्या दौर्‍याचा चीनने घेतला धसका, बिथरलेल्या ड्रॅगनने सुरू केल्या बांग्लादेशाच्या भेटीगाठी

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच बांग्लादेश दौरा आटपून मायदेशी परतले आहेत. मात्र, पंतप्रधान मोदीच्या या दौऱ्याने चीनला चांगलीच धडकी भरली आहे. कारण मोदींनी केलेल्या या दौऱ्यानंतर घाबरलेल्या चीनने नवी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशला शस्त्रे देऊन आपले स्ट्रॅटेजिक संबंध दृढ करण्याचा चीनने प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध आपल्यासाठी अडचण निर्माण ठरू नयेत याची खबरदारी चीनने घेतली आहे. चीनने तडकाफडकी चीनमधील शस्त्रे बनवणाऱ्या सरकारी कंपनी नोरिंकोच्या आशिया-पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापक वांग हेंग यांना 11 एप्रिल रोजी एका शिष्टमंडळासह बांगलादेशच्या दौऱ्यावर पाठवले होते. ढाका कँटमध्ये या शिष्टमंडळाने बांगलादेशाच्या तोफखाना संचालकांची भेट घेतली. त्यांना आधुनिक तोफा तसेच नव्याने विकसित केलेल्या शस्त्राबाबत चर्चा केली. गुप्त रिपोर्ट्सनुसार, 41 तज्ञांची एक दुसरी टीम येत्या 3 महिन्यांत बांगलादेशाचा दौरा करणार आहे. ही टीम टी-59 च्या अपग्रेडेशनसाठी बांगलादेशात जाणार आहे. चीन बांगलादेशात आपले वर्चस्व निर्माण करत आहे. यामुळेच यंदा भारतीय वायूसेनेचे प्रमुख आरकेएस भदोरिया आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी बांगलादेशाचा दौरा केला होता. रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये चीन आणि बांगलादेशातील संबंध भागीदारीत बदलले होते. दोन्ही देशांत विविध प्रकारचे 27 करार झाले होते. चीनकडून बेल्ट रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत जवळपास 38 अरब डॉलर्सची गुंतवणूक केली होती. चीन आपल्या कर्ज पुरवठ्याच्या धोरणाखाली अनेक लहान आणि गरजू देशांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.