#Modisarkar2 : मोदी 2 पर्वाला सुरुवात, या खासदारांनी घेतली मंत्रि‍पदाची शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. मोदींनी आज नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तर त्यांच्यासोबत २५ खासदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

नरेंद्र मोदी यांच्यासह राजनाथ सिंह, अमित शहा, नीतीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन, रामविलास पासवान, रविशंकर प्रसाद, हरसिमरत कौर, थावरचंद गहलोत, सुब्रमण्यम जयशंकर, डॉ. पोखरियाल निशांक, प्रकाश जावडेकर, पीयुष गोयल यांच्यासह एकूण २५ खासदारांनी कॅबीनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर या नव्या सरकारमध्ये स्वतंत्र कार्यभार असलेले ९ राज्यमंत्री तर २४ राज्यमंत्री यांनी शपथ घेतली.

हे आहेत कॅबीनेटमधील मंत्री

१. नरेंद्र मोदी, पंतप्रधान
२. राजनाथ सिंह
३. अमित शहा
४. नितीन गडकरी
५. सदानंद गौडा
६. निर्मला सीतारामन
७. रामविलास पासवान
८. नरेंद्रसिंह तोमर
९. रविशंकर प्रसाद
१०. हरसिमरत कौर बादल
११. थावरचंद गेहलोत
१२. सुब्रमण्यम जयशंकर
१३. डॉ. रमेश पोखरियाल निशांक
१४. अर्जुन मुंडा
१५. स्मृती इराणी
१६. डॉ. हर्षवर्धन
१७. प्रकाश जावडेकर
१८. पीयूष गोयल
१९. धर्मेंद्र प्रधान
२०. मुख्तार अब्बास नक्वी
२१. प्रल्हाद जोशी
२२. डॉ. महेंद्रनाथ पांडे
२३. अरविंद सावंत (शिवसेना)
२४. गिरीराज सिंह
२५. गजेंद्रसिंह शेखावत

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

१. संतोषकुमार गंगवार
२. राव इंद्रजीत सिंह
३. श्रीपाद नाईक
४. डॉ. जितेंद्र सिंह
५. किरण रिजिजू
६. प्रल्हादसिंह पटेल
७. आर. के. सिंह
८. हरदीपसिंग पुरी
९. मनसुख मांडवीय

राज्यमंत्री

१. फग्गनसिंह कुलस्ते
२. अश्विनीकुमार चौबे
३. अर्जुन राम मेघवाल
४. जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह
५. कृष्णपाल गुर्जर
६. रावसाहेब दानवे
७. किशन रेड्डी
८. पुरुषोत्तम रुपाला
९. रामदास आठवले
१०. साध्वी निरंजन ज्योती
११. बाबुल सुप्रियो
१२. डॉ. संजीवकुमार बलियान
१३. संजय धोत्रे
१४. अनुराग ठाकूर
१५. सुरेश अंगडी
१६. नित्यानंद राय
१७. रतनलाल कटारिया
१८. व्ही. मुरलीधरन
१९. रेणुकासिंह सरूता
२०. सोमप्रकाश
२१. रामेश्वर तेली
२२. प्रतापचंद्र सारंगी
२३. कैलाश चौधरी
२४. देवश्री चौधरी

Loading...
You might also like