‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या ४ निर्मात्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट येत्या ५ एप्रिलला निवडणुकीच्या धामधुमीत प्रदर्शित होत आहे. मात्र, सध्या तरी तो अडचणीत आला आहे. कारण निवडणुक आयोगाने या चित्रपटाच्या चार निर्मात्यांना नोटीस पाठविली आहे. काँग्रेस आणि सीपीएम यांनी चित्रपटसृष्टीतून निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. हा चित्रपट राजकीय हेतूने याच काळात प्रदर्शित करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठविली आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी २० मार्च रोजी दोन वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या दोन वृत्तपत्रांनाही निवडणुक आयोगाने नोटीस पाठविली असून खुलासा करण्याचा आदेश दिला आहे.

निर्मात्यांच्या खुलाशानंतर निवडणुक आयोग या चित्रपटाबाबत निर्णय घेणार असल्याने सध्या तरी हा चित्रपट अडचणीत आला आहे.