चित्रपट गृहांमध्ये पुन्हा रिलीज होणार PM मोदींचा बायोपिक, ‘हे’ आहे कारण

मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे भारतात मार्चमध्ये चित्रपटगृह बंद करण्यात आली होती. मोठ्या कालावधीनंतर 15 ऑक्टोबरला पुन्हा चित्रपटगृह उघडणार आहेत. चित्रपटगृह पुन्हा उघडण्यासोबत विवेक ओबेरॉय स्टारर पीएम मोदींचा बायोपिक पुन्हा एकदा रिलीज करण्यात येईल.

पीएम मोदींचा जीवनप्रवास
ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट 2019 मध्ये रिलिज झाला होता. यामध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनण्यापासून 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयापर्यंतचा प्रवास दाखवला आहे.

खुप मेहनतीने बनवला चित्रपट : ओमंग कुमार
ओमंग कुमारने म्हटले की, मी आनंदी आणि समाधानी आहे की, चित्रपटगृह उघडल्यानंतर आमचा चित्रपट पीएम नरेंद्र मोदी पुन्हा एकदा रिलिज होणार आहे. आम्ही हा चित्रपट बनवण्यासाठी खुप मेहनत केली आहे, आणि ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला नव्हता, त्यांना तो पहाण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे.

मोठ्या स्टारकास्टसह बनवला चित्रपट
या चित्रपटात विवेक ओबेरॉयसह बोमन ईरानी, दर्शन कुमार, मनोज जोशी, प्रशांत नारायणन, जरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यतीन कारेकर, राजेश गुप्ता आणि अक्षत आर. सलूजा यांनी सुद्धा आहेत.

राजकीय अजेंडामुळे लोकांनी पाहिला नाही चित्रपट
चित्रपटाचे सह निर्माता संदीप सिंह यांनी म्हटले की, चित्रपटगृह उघडताच पुन्हा एकदा आजच्या काळातील सर्वात प्रभावी आणि प्रेरणादायी नेत्याची कथा पहाण्यास मिळणे, यापेक्षा चांगले काय असू शकते. चित्रपट रिलिज झाल्यानंतर काही राजकीय अजेंडामुळे चित्रपट चालला नाही, अनेक लोक तो पाहू शकले नाहीत. आता ते पाहू शकतील.