दिग्गजांनी दिल्या PM मोदींना जन्मदिवसाच्या ‘शुभेच्छा’, ‘मास्टर ब्लास्टर’ पासून ‘खिलाडी’ अक्षय पर्यंत सगळयांनी केल्या ‘या’ पोस्ट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन (अक्षय भुजबळ) – आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ६९ वा वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नरेंद्र मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. सकाळीच मोदींनी सरदार सरोवराला भेट दिली. त्यानंतर ते नर्मदेची आरतीही करणार आहेत. मातोश्री हिराबेन यांचे आशीर्वाद घेऊन पुढील दिनक्रमासाठी नरेंद्र मोदी प्रस्थान करणार आहेत.

ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्यापैकी निवडक व्यक्तीच्या शुभेच्छा…

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी करोडो युवांचे प्रेरणास्थान नरेंद्र मोदी यांना जन्म दिवसाच्या शुभेच्छा देत एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून पोस्ट केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुम्ही दीर्घायुषी व्हा, असे म्हणत मोदींना जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकासपुरुष नव भारताचे शिल्पकार’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेते अक्षय कुमारणे थेट संजय लीला भन्साळी यांच्या नव्या सिनेमाचे पोस्टर टाकत नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सिनेमा मोदींच्या आयुष्याशी समरस गोष्टी दाखवणारा आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या आत्मचरित्राचे फोटो ट्विटरवर टाकत पंतप्रधान मोदींना जन्म दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील सर्व लोकांना तुम्ही तुमच्या कामातून एक प्रेरणा देत असल्याचे खेर यांनी यावेळी म्हंटले आहे.

विराट कोहलीने सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्म दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताला निरोगी आणि स्वच्छ ठेवणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला शुभेच्छा असे म्हणत पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like