भारतात अमेरिकेसारखच होणार ? ‘एक देश, एक निवडणुक’ यावर चर्चा करण्यासाठी PM मोदींनी बोलावली सर्व पक्षांच्या अध्यक्षांची बैठक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश, एक निवडणूक या मुद्यावर चर्चा करण्यासाठी संसद भवनामध्ये सर्व पक्षाच्या अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक १९ जूनला होणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत एक देश – एक निवडणूक आणि महात्मा गांधी यांची १५० वी जयंती या विषयी चर्चा करणार आहेत. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जूनला लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांची बैठक देखील बोलावली आहे. जोशी यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी सर्व खासदार आणि मंत्र्यांमध्ये संघ भावना निर्माण करू इच्छितात.

रविवारी बोलवण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीविषयी प्रल्हाद जोशी म्हणाले की आम्हाला विरोधी पक्षांचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. बैठकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या वेळेस संसदेत अनेक नवीन चेहरे आले आहेत आणि त्यांच्या नवीन विचारांच देखील स्वागत केलं पाहिजे. १९ जूनच्या होणाऱ्या बैठकीत मोदी उपस्थित राहणार आहेत.

जोशी यांनी सांगितले की, २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. याबरोबरच महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. यासंबंधी कार्यक्रमांचे आयोजनाची चर्चा करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलावली आहे. सोमवारी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाची देखील सुरवात होईल.

सिने जगत –

सलमान खान म्हणतो, ‘हे’ वय लग्नासाठी एकदम ‘सही’

‘लाल सिंह चढ्ढा’ मध्ये पुन्हा ‘थ्री इडियट’ची जोडी आमिर खान व करिना कपूर घालणार प्रेक्षकांना ‘भुरळ’

…म्हणून सनी लिओनी उत्‍तर प्रदेशची स्थानिक भाषा शिकतेय

पुजा गुप्ताचे ‘ते’ फोटो सोशलवर व्हायरल

 

You might also like