PM नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात उल्लेख करीत असलेलं ‘ते’ ठिकाण ‘पर्यटनस्थळ’ म्हणून घोषित केलं जाणार

वडनगर : वृत्तसंस्था – एक चहावाला ते पंतप्रधान असा प्रवास असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुकानाचे पर्यटनस्थळामध्ये रुपांतर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकायचे. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख वारंवार केला आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी नुकतीच वडनगरला भेट दिली. ज्या ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करता येतील अशा ठिकाणाचा आढावा त्यांनी घेतला. पटेल यांनी वडनगर रेल्वे स्टेशनला जाऊन तिथे पर्यटनस्थळ विकसित करण्याची घोषणा केली.

देशाचे पंतप्रधान कधीकाळी चहा विकण्याचा व्यवसाय करत होते. ही गोष्ट सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांच्या चहा विकण्यावरून खिल्ली उडवली होती. मोदी एकविसाव्या शतकात कधीच पंतप्रधान बनू शकत नाही. मात्र, त्यांना वाटले तर ते AICC अधिवेशनात चहा विकू शकतात असे अय्यर म्हणाले होते.

मणिशंकर अय्यर यांच्या टीकेचा मुद्दा मोदींनी प्रचाराचा महत्वाचा बनवला. यानंतर भाजपाने चाय पे चर्चा ही मोहीम राबवली होती. प्रल्हाद पटेल यांनी या दुकानाची पाहणी केली. ही चहाची टपरी पत्र्याची असून त्याच्या खालच्या भागात गंज पकडला आहे. हा गंज आणखी वाढू नये यासाठी पटेल यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –