PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये दिसली ‘कोकाकोला’ची बाटली, PMO नं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ह्युस्टनमध्ये झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमानंतर न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत या दोघांच्या मध्ये ठेवण्यात आलेल्या टेबलवरील एका कोकाकोलाच्या बाटलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावर आता भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

या बाटलीविषयी स्पष्टीकरण देताना पंतप्रधान कार्यालयाने सांगितले कि,  हि बैठक अमेरिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे बैठक व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात आली होती. राष्ट्रपती ट्रम्प हे नियमितपणे कोक पीत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हि बाटली ठेवण्यात आली होती. या बैठकीत ट्रम्प यांनी मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.

यावेळी ट्रम्प म्हणाले कि, मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. या बैठकीत मोदी यांनी दहशतवादावर देखील मनमोकळ्या गप्पा मारल्या तसेच आपले मत देखील मांडले. तसेच दोन्ही देश मिळून काश्मीरच्या मुद्द्यावर देखील मार्ग काढू शकतो. तसेच दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सात दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर असून यामध्ये ते विविध विषयांवर चर्चा करणार असून काही करारांवर चर्चा देखील होणार असल्याची शक्यता आहे.

 

Visit : policenama.com