×
Homeताज्या बातम्याPM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा...

PM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट, ‘त्या’ ऑडिओ मेसेजनं प्रचंड खळबळ

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) याच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यासंदर्भात काही संदेश (ऑडिओ क्लीप्स) मुंबई वाहतूक पोलिसांना (Mumbai Traffic Police) पाठविले आहेत. या संदेशामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. त्यामुळे दाऊद इब्राहीम गँगशी संबधित लोक आणि इतरांचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. (PM Narendra Modi)

अज्ञात व्यक्तीकडून मुंबई वाहतूक पोलिसांना अनेक ऑडिओ क्लीप्स प्राप्त झाल्या आहेत. या ऑडिओ क्लिप्समध्ये एक अज्ञात व्यक्ती दावा करत आहे की, कुख्यात दाऊद इब्राहीम गँगचे लोक किंवा हस्तक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट रचत आहेत. तसेच हे लोक देशाला बर्बाद करण्याच्या देखील प्रयत्नात असल्याचे या क्लिप मध्ये म्हंटले आहे. 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप्स आणि काही संदेश आले आहेत. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप्स आणि काही संदेश प्राप्त झाले. (PM Narendra Modi)

याप्रकरणी कसून तपास सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
पोलीस तपासात सर्व पोलिसी सूत्र एका इसमाकडे बोट दाखवित आहेत.
या इसमाच्या चौकशीला देखील पोलिसांनी सुरुवात केली आहे. हा इसम पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत नोकरीला होता.
परंतु मानसिक आजाराने तो ग्रस्त असल्याने त्याला नोकरीवरुन काढण्यात आले होते.
तो सध्या गेले वर्षभर बेकार आहे. त्यामुळे त्याने हे संदेश का पाठविले, किंवा यामागे आणखी कोणाचा हात आहे का,
याचा पोलीस तपास करत आहेत.

Web Title :- PM Narendra Modi | conspiracy to assassinate pm narendra modi by underworld don dawood henchmen unknown audio message on mumbai traffic police mobile

Kartik Aaryan | कार्तिकने ‘दृश्यम 2’ आणि ‘भूल भुलैय्या 2’ यांच्यातील कनेक्शनबाबत केला मोठा खुलासा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News