Corona लस घेतेवेळी पंतप्रधान म्हणाले – ‘नेते मंडळी जाड कातडीची असतात. त्यामुळे मोठी सुई लावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. पुद्दुचेरीची नर्स पी. निवेदाने नरेंद्र मोदींना लस टोचविली. लस टोचविताना पीएम मोदी नर्सला म्हणाले कि, ‘नेते मंडळी जाड कातडीची असतात. त्यामुळे मोठी सुई लावा.’ वास्तविक जेव्हा नरेंद्र मोदी सकाळी एम्स रुग्णालयात पोहोचले तेव्हा तिथला मेडिकल स्टाफ थोडा नर्व्हस होता. हे गंभीर वातावरण हलके करण्यासाठी पंतप्रधांनी मोठ्या सुईची मागणी केली.

पंतप्रधानांनी नर्सला विचारले कि, तुमचे नाव काय आहे आणि आपण कोठून आहात. यांनतर मोदींनी गंमत करत म्हंटले कि, ‘ते प्राण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या सुईचा वापर करणार का ? कारणं नेते मंडळींची कातडी जाड असते, त्यामुळे त्यांच्यासाठी कोणत्या विशेष सुईचा वापर करणार का? यावर नर्स हसली आणि रिलॅक्स झाली. पंतप्रधानांना जेव्हा लस टोचवली गेली. त्यांनी नर्सला म्हंटले कि, लस टोचवली,मात्र समजले देखील नाही. लसीकरणादरम्यान पीएम मोदींचा चेहऱ्यावर हास्यच होते.

दरम्यान, कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. जनतेची पाळी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे आले आणि प्रथम लस टोचविली . पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी एम्समध्ये पोहोचले. ना ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आले, ना कुणाला रोखण्यात आले. सकाळी रिकाम्या रस्त्यांवर पंतप्रधानांची कार धावली. कोणी असा विचारही केली नसेल कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाप्रकारे एम्समध्ये पोहोचतील. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यानंतर ते थेट लसीकरण करण्यात येणाऱ्या खोलीत पोहोचले. पुद्दुचेरीची परिचारिका पी. निवेदा यांनी पंतप्रधान मोदींना लसीचा पहिला डोस दिला. तिच्यासमवेत केरळची नर्स रोझ्मा अनिल देखील होती.

या लसीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉलचे पालन केले. अर्धा तास थांबले. यावेळी, एम्सचे डॉ. गुलेरिया त्यांना पोस्ट लसीबद्दल सांगत राहिले. पंतप्रधानांना लसीचा पुढचा डोस 28 दिवसांनंतर दिला जाईल. पंतप्रधानांनी स्वत: ट्विट करुन लसविषयी माहिती दिली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 टक्के घरगुती लस कोवॅक्सिन घेतली, यासाठी अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते, शंका व्यक्त केल्या जात आहेत. आज पंतप्रधानांनी कोवॅक्सिनचे डोस घेत सर्व शंका दूर केल्या.