PM मोदींनी दिला इशारा – ‘कोरोना’वर म्हणावे लागू नये ’मेरी कश्ती भी वहां डूबी जहां पानी कम था’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटावर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत वाढत असलेल्या कोरोना केस आणि वॅक्सीनच्या वितरणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीत पीएम मोदी यांनी म्हटले की, भारत चांगल्या वॅक्सीनवरच जोर देईल आणि वॅक्सीनला शास्त्रीय आधारावर तपासले जाईल. परंतु वॅक्सीनसोबतच पीएम मोदी यांनी पुन्हा आठवण करून दिली की, प्रत्येकाला अजूनही सतर्कता बाळगावी लागेल.

आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा देताना म्हटले की, राज्यांना सतर्कता बाळगावी लागेल; अन्यथा अशी स्थिती निर्माण होऊ नये की, म्हणावे लागेल की, मेरी कश्ती भी डूबी वहां, जहां पानी कम था.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हटले की, कोरोनाच्या लढाईत प्रत्येकजण आहे, जर मुख्यमंत्र्यांकडे आणखी काही सूचना असतील त्या लेखी आम्हाला द्याव्यात. पीएम मोदी यांनी म्हटले की, देशात टेस्टिंगचे नेटवर्क काम करत आहे, देशात मेडिकल कॉलेज आणि जिल्हा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सप्लायचे काम सुरू आहे.

लोकांना सतर्कता बाळगावी लागेल
पीएम मोदी यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, आमच्याकडे योग्य आकडा आहे, अशावेळी पूर्ण तयारी करावी लागेल. सुरुवातीला कोरोनाप्रति लोकांमध्ये भीती होती, तेव्हा लोक भीतीने आत्महत्यासुद्धा करत होते. त्यानंतर लोकांमध्ये एकमेकांबद्दल संशय येत होता. आता लोक कोरोनाबाबत गंभीर होऊ लागले आहेत, परंतु काही मर्यादेपर्यंत लोकांना वाटू लागले आहे की, व्हायरस कमजोर झाला आहे.

पंतप्रधान म्हणाले, काही लोक बेपर्वाई करू लागले आहेत, अशावेळी जागृत करणे आवश्यक आहे. आता आपण आपत्तीच्या खोल समुद्रातून किनार्‍याकडे जाऊ लागलो आहोत, ज्या देशांमध्ये कोरोना कमी होत होता, तिथे आता केस वाढू लागल्या आहेत. अशावेळी प्रत्येकाला सतर्क व्हावे लागेल.

मृत्युदर कमी करण्यावर भर
कोरोना संकटावर मोदी म्हणाले, आपल्याला पॉझिटिव्हिटी रेटला पाच टक्केपेक्षा कमी ठेवावे लागेल, राज्याच्या पुढे जाऊन लोकलवर फोकस करावा लागेल. सोबतच टेस्टिंगमध्ये आरटी पीसीआरची संख्या वाढवली पाहिजे, तसेच घरात जे रुग्ण आहेत, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मृत्यूचा आकडा दोन टक्केच्या खाली ठेवावा लागेल.

वॅक्सीनवर तयारी करा
वॅक्सीनबाबत पीएम मोदी यांनी म्हटले की, जगात वॅक्सीनबाबत कुठेही अपडेट होत असेल, त्यावर भारत सरकार नजर ठेवून आहे. आता हे ठरलेले नाही की, वॅक्सीनचे किती डोस असतील, किंमत किती असेल. वॅक्सीनवर जगासोबत भारतीय डेव्हलपर्ससोबत आमची टीम काम करत आहे.

पीएम मोदी म्हणाले, भारत प्रत्येक शास्त्रीय तंत्रज्ञानावर पडताळणी झाल्यानंतरच वॅक्सीनचा वापर करेल. कुणाला अगोदर वॅक्सीन दिली जाईल, हे राज्यांसोबत चर्चा केल्यानंतरच ठरेल, परंतु राज्यांना कोल्ड स्टोरेजवर काम सुरू करावे लागेल.

जगातील अनेक वॅक्सीन भारतात तयार होत आहेत, परंतु कोणती वॅक्सीन वापरली जाईल हे अजून ठरलेले नाही. पीएम मोदी यांनी राज्यांना अपील केले आहे की, लवकरच लेखी स्वरूपात आपल्या सूचना द्याव्यात.