Twitter वर PM नरेंद्र मोदींचे झाले 6 कोटी फॉलोअर्स, वाचा ट्विटरवर टॉप-20 मध्ये असलेल्यांची यादी
ट्विटरवरील 20 शक्तिशाली लोक
ट्विटरवर शक्तिशाली लोकांमध्ये 10 संगीतकार, 3 राजकीय नेते, दोन एंटरटेनर, एक मीडिया पर्सनॅलिटी आणि एक खेळाडू आहे. याशिवाय तीन ब्रँड सुद्धा आहेत.
नाव फॉलोअर कोण आहेत?
बराक ओबामा 12.7 कोटी माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
जस्टिन बीबर 11.2 कोटी पॉप स्टार
केटी पेरी 10.83 कोटी सिंगर
रिहाना 9.74 कोटी पॉप स्टार
टेलर स्विफ्ट 8.65 कोटी पॉप स्टार
क्रिस्टीयानो रोनाल्डो 8.63 कोटी फुटबॉलर
डोनाल्ड ट्रम्प 8.34 कोटी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
लेडी गागा 8.17 कोटी पॉप स्टार
एलेन डिजेनर्स 8 कोटी कॉमेडियन
अरियाना ग्रँडे 7.56 कोटी सिंगर
यूट्यूब 7.22 कोटी उद्योग
किम करदाशियन 6.57 कोटी बिझनेसवुमन
जस्टिन टिम्बरलेक 6.44 कोटी सिंगर
सेलेना गोमेज 6.16 कोटी सिंगर
नरेंद्र मोदी 6 कोटी भारताचे पंतप्रधान
सीएनएन न्यूज ब्रेकिंग 5.83 कोटी मीडिया
ट्विटर 5.82 कोटी उद्योग
ब्रिटनी स्पेयर्स 5.59 कोटी पॉप स्टार
टीम डेमी 5.54 कोटी सिंगर
शकीरा 5.22 कोटी पॉप स्टार
(स्त्रोत- Brandwatch)
याशिवाय पीएम मोदी यांचे फेसबुकवर 4.5 कोटी, इंस्टाग्रामवर 4.53 कोटी फॉलोअर आहेत.
ट्विटरवर सर्वात जास्त लोकप्रिय नेत्यांमध्ये सर्वात वर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आहेत. ओबामा यांच्या ट्विटरवर 120.7 मिलियन फॉलोअर्स आहेत, म्हणजे त्यांना 12 कोटी लोक फॉलो करत आहेत. दुसर्या नंबरवर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर 83.7 मिलियन म्हणजे 8 कोटी 37 लाख लोक फॉलो करत आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर 52 लाख लोक फॉलो करत आहेत. राहुल एप्रिल 2015 मध्ये ट्विटरवर जोडले गेले. याशिवाय फेब्रुवारी 2019 मध्ये ट्विटरशी जोडले गेलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांचे ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 25 लाख (2.5 मिलियन) आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 करोड 99 लाख लोक फॉलो करत आहेत.