PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले – ‘घराणेशाही जपणार्‍या पक्षांकडून लोकशाहीचे रक्षण होणार नाही’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  PM Narendra Modi | संविधान (राज्यघटना) दिनानिमित्त (constitution day) संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमावर काँग्रेससह (Congress) १५ विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. कार्यक्रमात या बहिष्काराचा उल्लेख न करता तसेच नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. घराणेशाही जपणाऱ्या व एकाच कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्या चालविल्या जाणाऱ्या पक्षांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालत नाही. लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण होण्याची अपेक्षा अशा पक्षांकडून करता येणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

 

मोदी म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्य घटनेचा स्वीकार देशाने ज्या दिवशी केला तो दिवस स्मरणात रहावा म्हणून दरवर्षी राज्यघटना दिन म्हणून साजरा केला जातो.
मात्र हा दिवस साजरा करण्याची गरज काय असा प्रश्न काहीजण विचारत आहेत.
पण असे प्रश्न विचारणाऱ्यांची मते एकूण घेण्यास देशातील नागरिक तयार नाहीत.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नजर टाकली तर लक्षात येईल की, देश एका संकटातून जात आहे.
देशात आज जी स्थिती निर्माण झाली आहे ती घराणेशाही जोपासणाऱ्या पक्षांमुळे. राज्यघटनेवर नितांत श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ही चिंतेची बाब आहे.

 

काही लोकांनी राज्यघटना दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला म्हणून आमच्यावर टीका केली. डाॅ. आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली.
त्या भव्य कामगिरीशी या दिवसाचा संबंध आहे, हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
यापूर्वीच जर प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच २६ नोव्हेंबरला राज्यघटना दिन पाळण्याची प्रथा सुरु झाली असती तर चांगले झाले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.

 

भ्रष्टाचाऱ्यांचे उपद्व्याप विसरू नका

 

सार्वजनिक जीवनात प्रत्येकाने भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या, शिक्षा सुनावण्यात आलेल्या लोकांचे उपद्व्याप विसरून त्यांची स्तुती करण्यापासून लांब राहिले पाहिजे असेही नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितले. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले नागरिक तसेच हुतात्मा झालेले पोलीस यांना मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

 

Web Title : PM Narendra Modi | democracy will not be safeguarded patronizing parties pm modi targets congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Cyber Crime | पुण्यात आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी गुन्हा दाखल; 100 पैकी 92 प्रश्न सारखे असल्याचे तपासणीत निष्पन्न

Jacqueline Fernandez | ठग सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलीन फर्नांडिसचा रोमँटिक फोटो झाला व्हायरल

Pune Cyber Crime | 18 बँकांमधील 41 खात्यांद्वारे सायबर चोरट्याने घातला डॉक्टराला दीड कोटींना गंडा