भव्य शक्तिप्रदर्शनासह पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल ; शिवसेना पक्षप्रमुखांची उपस्थिती

लखनऊ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदींचा अर्ज दाखल करतेवेळी भाजप महायुतीचे नेते तसेच शिसवेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिलला होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुक लढत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदार संघातून त्यांनी आज मोठा रोड शो करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपा महायुतीचे तसेच मित्रपक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यावेळी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी एनडीए तर्फे खूप मोठा रोड शो करण्यात आला. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी काळभैरवाची पूजा त्यांनी केली आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला.

वाराणसी लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय यांच्यात ही लढत होणार आहे.

Loading...
You might also like