PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अपयशी ठरल्याची सर्वत्र टीका होत असतानाच मोदींच्या लोकप्रियतेत घट झालं असल्याचं पुढं आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) लोकप्रियतेच्या स्कोअरमध्ये जवळजवळ 20 टक्क्यांनी घट झालीय आहे. विशेष म्हणजे जरी स्कोअरमध्ये घट झाली असली तरी मोदींनी अन्य देशातील नेत्यांना मागे टाकलं असल्याचं सर्व्हेक्षणामधून समोर आलं आहे. अमेरिका आधारित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने (US Data Intelligence Company Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) तुलना ही 13 देशांमधील नेत्यांच्या तुलनेत अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.(Despite the decline in popularity, Narendra Modi is the best leader)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अमेरिका आधारित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने (US Data Intelligence Company Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये 2126 भारतीयांना सहभागी करुन घेण्यात आले होते.
अशी माहिती दिली आहे. यावरून 66 टक्के भारतीयांना पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) बाजू घेतली आहे.
तसेच 28 टक्के लोकांनी मोदींविरोधात मत नोंदवली आहेत.
या सर्वेक्षणानुसार यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रथम क्रमांकावर आहेत.
तसेच इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी (Mario Draghi) 65 टक्क्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
त्यानंतर अनुक्रमे मेक्सिको (Mexico), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि जर्मनी (Germany) या देशाचा क्रमांक आहे.
मुख्यतः बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) हे 53 टक्क्यांसोबत सहाव्या क्रमांकावर आहेत.

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियते बाबत माहिती आणि आकडेवारी गोळा करणाऱ्या आणि या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्याबाबत सर्वसामान्याचे मत जाणून घेणाऱ्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ची (Global Approval Rating) ताजी आकडेवारी समोर आली आहे.
2019 मध्ये जेव्हा मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता त्यादरम्यान त्यांचा स्कोअर हे 82 टक्के इतका होता.
2020 जून महिन्यामध्ये मोदींचं (PM Narendra Modi) स्कोअर 63 टक्के एवढं होतं. परंतु, यावेळीही त्यांनी अन्य नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे.

गुणांकनानुसार लोकप्रिय नेत्यांची नावे (टक्क्यानुसार) –

 

1. नरेंद्र मोदी : भारत – 66 टक्के

2. मारियो ड्रॅगी ꓽ इटली – 65

3. एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर ꓽ मेक्सिको – 63

4. स्कॉट मॉरिसन ꓽ ऑस्ट्रेलिया – 54

5. अँजेला मार्कल ꓽ जर्मनी – 53

6. जो बायडन ꓽ अमेरिका – 53

7. जस्टिन ट्रूडो ꓽ कॅनडा – 48

8. बोरिस जॉन्सन ꓽ युके – 44

9. मून जे-इन ꓽ दक्षिण कोरिया – 37

10. पेड्रो सांचेज़ ꓽ स्पेन – 36

11. जायर बोल्सोनारो ꓽ ब्राझील – 35

12. इमैनुएल मॅक्रॉन ꓽ फ्रान्स – 35

13. योशीहिदे सुगा ꓽ जपान – 29

 

Web Title : Pm Narendra Modi | global leader approval tracker morning consult pm narendra modi approval rating fell 20 points

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकार बदलणार नियम?, आता 12 तासाच काम अन् अर्धा तासाचा ब्रेक, पगार कमी अन् पीएफ मिळणार जास्त