नरेंद्र मोदींचा ‘ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड’ने सन्मान, PM म्हणाले – ‘हा कोट्यवधी भारतीयांचा सन्मान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज ‘ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड’ने गौरवण्यात आलं. हा अवॉर्ड त्यांना बिल गेट्स यांच्या हस्ते देण्यात आला. हा अवॉर्ड दरवर्षी 17 ध्येयांमध्ये कोणत्याही एकावर चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. स्वच्छतेच्या दिशेने चांगलं काम करणाऱ्यासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

हा माझा नाही तर करोडो भारतीयांचा सन्मान

न्यूयॉर्कमध्ये आयोजित ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही. करोडो भारतीयांचा सन्मान आहे ज्यांनी स्वच्छ भारताचं स्वप्न ना फक्त पूर्ण केलं तर याला आपल्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा बनवलं.”

गेल्या 5 वर्षात भारतात बनवले 11 कोटी शौचालये

मोदी म्हणाले, “गेल्या 5 वर्षात भारतात 11 कोटी शौचालये बनवण्यात आली. महात्मा गांधी यांचं स्वच्छतेचं स्वप्न साकार होणार आहे. गांधीजी म्हणाले होते, एक आदर्श गाव तेव्हाच बनतं जेव्हा ते स्वच्छ असतं. आज आम्ही गाव नाही तर पूर्ण देशाला स्वच्छ बनवण्याच्या मार्गावर आहोत.”

2017 मध्ये घेण्यात आलं होतं पहिलं अवॉर्ड फंक्शन

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने गोलकीपर अवॉर्डची सुरुवात केली. हा अवॉर्ड लोकांना 17 ध्येय गाठण्याच्या दिशेने केलेल्या कामासाठी प्रेरीत करतो. पहिला ग्लोबल गोलकीपर्स अवॉर्ड कार्यक्रम 2017 साली आयोजित करण्यात आला आहे. 17 ध्येयांपैकी एका ध्येयावर चांगलं काम करणाऱ्याला हा अवॉर्ड दिला जातो. याला गोलकीपर ग्लोबल अवॉर्डही म्हणतात.

या 17 ध्येयांवर काम केल्यानंतर मिळतो हा अवॉर्ड

2015 साली 193 देशांच्या प्रतिनिधींचे चांगलं जग बनवण्याच्या हेतूने 17 ध्येय गाठण्यावर एकमत झाले होते. ही सर्व ध्येये देशांना 2030 पर्यंत गाठायची आहे.
ही आहेत 17 ध्येये-

1. गरीबी हटवणं
2. भूक मिटवणं
3. चांगलं आरोग्य
4. गुणवत्तापूर्ण शिक्षण
5. लिंग समानता
6. स्वच्छ पाणी व स्वच्छता
7. वाजवी किंमतीत स्वच्छ ऊर्जा
8. आर्थिक वृद्धी
9. उद्योग, नवाचार आणि आधारभूत संरचना
10. असमानता कमी करणं
11. शहरं आणि समुदायाचा शाश्वत विकास
12. जबाबदार वापर आणि उत्पादन
13. हवामान सुधारणा
14. पाण्यातील जीवांसाठी चांगलं वातावरण
15. पृथ्वीवरील जीवांसाठी चांगलं वातावरण
16. शांती, न्याय आणि मजबूत संस्था
17. ध्येयासाठी भागिदारी

काश्मीरच्या काही नोबेल विजेत्यांचा या अवॉर्डला विरोध

काही नोबेल विजेत्यांनी नरेंद्र मोदींना अवॉर्ड देण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यांना हा अवॉर्ड देऊ नये अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी काश्मीर प्रश्नावर युक्तिवाद केला.

Visit : policenama.com