PM मोदी अमेरिकेतून परतले, पालम विमानतळावर हजारो कार्यकर्त्यांनी केलं स्वागत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सात दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी देशात परतले. रात्री ८:३० वाजता त्यांचे विमान दिल्लीतील पालम विमानतळावर पोहोचले. दिल्लीतील पालम विमानतळावर मोदींच्या शानदार स्वागतासाठी मोठी तयारी झाली असून भाजपच्या मते पीएम मोदी यांच्या स्वागतासाठी २०,००० कार्यकर्ते उपस्थित आहेत.

तत्पूर्वी, भाजपाचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा आणि खासदार मनोज तिवारी हे मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधानांच्या पारंपारिक स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. लोकगायक आणि कलाकार येथे पोहोचले आहेत. विमानतळावर ढोल वाजवले जात आहेत.

भाजपच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांनी अमेरिकेत ज्या पद्धतीने देशाचा अभिमान वाढविला आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे त्या दृष्टीने एक मोठा उत्सव साजरा करण्यात येईल.

पंतप्रधान मोदी आणि टीम सकाळी ८:३० वाजता पालम विमानतळावरून निघून एअरपोर्ट रोड येथून तिमया मार्गावर पोहोचेल. येथे पंतप्रधानांचा रोड शोचा कार्यक्रम आहे. रोड शो तिमया मार्गावर संपेल. हा सुमारे अडीच किलोमीटरचा प्रवास असेल. यानंतर पंतप्रधानांचा काफिला थेट परेड रोडमार्गे गुरुग्राम रोडमार्गे पंतप्रधान निवासस्थानी पोहोचेल.

पंतप्रधान रविवारी करणार ‘मन की बात’ :
रविवारी पंतप्रधान मोदी देशवासीयांबरोबर मन की बात च्या माध्यमातून संवाद साधतील. आठवड्याभराच्या दौर्‍याच्या सुरूवातीस पंतप्रधान मोदींनी ह्युस्टनमध्ये हाउडी मोदीच्या कार्यक्रमास संबोधित केले. याव्यतिरिक्त, त्यांनी अनेक देशांच्या प्रमुखांशी भेट घेतली आणि बर्‍याच सभांमध्ये भाग घेतला. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन आणि अमेरिकेत भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रंगला यांनी विमानतळावर पंतप्रधानांना निरोप दिला.

Visit : Policenama.com