PM Narendra Modi | ‘काँग्रेसवाले मला नीच, नाल्यातील किडा, मृत्यूचा व्यापारी म्हणतात, पण, मी…’ – नरेंद्र मोदी

गांधीनगर: पोलीसनामा ऑनलाइन – डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election 2022) मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष गुजरातमध्ये प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील जातीने प्रचारात उतरले आहेत. सुरेंद्र नगर येथे मोदींची एक सभा झाली. यावेळी मोदींनी काँग्रेसला धारेवर धरले. काँग्रेसवाले मला नीच, नाल्यातील किडा, मृत्यूचा व्यापारी म्हणतात, पण मी शांतपणे सर्व अपमान गिळतो, असे यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

काँग्रेस सतत माझ्यावर टीका करत राहाते. ते मला म्हणतात, आम्ही तुम्हाला (मोदी) तुमची लायकी दाखवू.

तुम्ही राजघराण्यातील आहात. मी एका सामान्य कुटुंबातील आहे. तुम्ही मला नीच, खालच्या जातीचा म्हणालात. माझी काहीच लायकी नाही. तुम्ही मला मृत्यूचा व्यापारी देखील म्हणालात. मला माझी लायकी दाखविण्यापेक्षा विकासावर बोला. मी असे अपमान गिळतो. मी अशा अपमानांकडे दुर्लक्ष करतो. कारण, मला भारताला एक विकसित देश बनवायचे आहे. मला 135 कोटी लोकांसाठी काम करायचे आहे. म्हणून मी अपमानाकडे दुर्लक्ष करत आलो आहे, असे यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

गुजरात मध्ये सत्ता विरोधी लाट नाही. ज्यांनी गुजरातला पाणी मिळू दिले नाही, ते भारत जोडो यात्रा करत आहेत. गुजरातला 24 तास वीज मिळून 10 वर्षे झाली. नर्मदेच्या विरोधकांना शिक्षा देण्यासाठी या निवडणुकीत मतदान करा. पद मिळावे म्हणून पदयात्रा केली जात आहे. पण गुजरातच्या नर्मदा विरोधकांना आपल्याकडे का ठेवायचे? गुजरातचा एकही नागरिक असा नसेल, ज्याने गुजरातचे मीठ खाल्ले नाही. पण काही लोक गुजरातचे मीठ खाऊन गुजरातला शिव्या देतात, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी मोदींनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
तसेच त्या पदासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra)
चालत आहेत, असे म्हंटले. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत आप (AAP) हा भाजपला (BJP) टक्कर देणारा
पक्ष म्हंटला जात आहे. त्यांच्या पाठोपाठ गुजरात काँग्रेस (INC) देखील मैदानात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या
यात्रेला किती गुण मिळाले, हे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरात निवडणुकांच्या निकालांवर
देखील ठरवता येऊ शकते. त्यामुळे सर्व अर्थांनी गुजरात विधानसभा महत्वाची झाली आहे.