COVID-19 : ‘कोरोना’चा ‘सामना’ करण्यासाठी PM मोदींनी मागितल्या ‘आयडिया’, 1 लाख रुपयांचं ‘बक्षीस’ देखील ‘जाहीर’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसबाबत भारतात सतत काळजी घेतली जात आहे. ताज्या आकड्यांनुसार, देशात आतापर्यंत कोविड-19 चे 114 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी देशातील जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधानांनी म्हटले की, तुमचे हे प्रयत्न अनेक प्रकारची मदत करू शकतात.

 

पीएम मोदी यांनी सोमवारी ट्विट केले की, अनेक लोक कोविड-19 साठी टेक्नॉलॉजीद्वारे उपाय सूचवत आहेत. मी त्यांना @mygovindia वर आपल्या सूचना मांडण्याचे आवाहन करतो. तुमचे हे प्रयत्न अनेकांची मदत करू शकतात. पीएम यांच्या ट्विटसोबत आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटचा बॅनर आहे. ज्यावर एका चॅलेंजबाबत माहिती दिली आहे. ज्याचे नाव आहे कोविड-19 Solution Challenge या चॅलेंजच्या विजेत्याला एक लाखाचे बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनाविरूद्ध एकजुटीचे प्रयत्न
यापूवी सोमवारी सकाळी ट्विट करताना मोदींनी लिहिले की, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. यात कोणतीही कसर राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच डॉक्टर, नर्स आणि आरोग्य अधिकार्‍यांचेही त्यांनी कौतूक केले.

पंतप्रधानांनी यासंदर्भातील विविध लोकांनी केलेल्या ट्विटला टॅगही केले आहे. हॅशटॅग इंडिया फाइट्स कोरोनाशी संबंधित ट्विटमध्ये मोदींनी म्हटले की, कोरोना वायरसला तोंड देण्यासाठी डाॅक्टर, नर्स, नगरपालिका कर्मचारी, विमानतळावरील कर्मचारी यांचे कौतूक केल्याने त्यांचे मनोबल वाढते.

एका व्यक्तीच्या ट्विटवर पीएमची प्रतिक्रिया
एका व्यक्तीने ट्विट केले होते की, मी माझ्या सर्व बैठका आणि व्यवसायिक प्रवास रद्द केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मोदींनी म्हटले की, बुद्धिमत्तापूर्ण निर्णय. विनाकारण प्रवास टाळला पहिजे आणि सामाजिक कार्यक्रम कमी करणे स्वागतार्ह आहे.