PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) 370 कलम हटवल्यानंतर आता एक महत्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) बोलावली आहे. पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सर्वपक्षीय नेत्यांची गुरुवारी (24 जून) रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी PM Narendra Modi या बैठकीत काय निर्णय घेणार हे बघावं लागणार आहे.
24 जून रोजी होणाऱ्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहां (Home Minister Amit Shah) यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
तर या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) विधानसभा निवडणूक घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सर्वपक्षीय नेत्यांच्या या बैठकीला मोदी सरकारकडून महत्त्वाचे मंत्री उपस्थित असतील.
तसेच, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
तसेच, जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) भाजप आणि काँग्रेसचे प्रमुख नेतेही या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरला (Jammu and Kashmir) मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आल्यानंतर जम्मू-काश्मीरची विभागणी 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली.
येथील राजकीय पक्षांनी याला विरोध केला.
पंतप्रधान नरेन्द्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) टीका केली गेली.
अशा सर्व विषयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी  जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.
यावरून आता काय निर्णय होणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Shiv Sena MLA Vaibhav Naik | शिवसेनेच्या आमदारानं दिला मोफत पेट्रोलसाठी नारायण राणेंच्या पेट्रोल पंपाचा पत्ता, अन्…

या दरम्यान, केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) कलम 370 हटवलं.
यानंतर राज्यातील अनेक पक्षांनी एकत्र होऊन पीपल्स अलायन्स फॉर गुप्कार डिक्लेरेशन नावानं एक आघाडी तयार केली.
यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचा देखील समावेश आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : pm narendra modi hold meeting all parties jammu and kashmir thursday

हे देखील वाचा

6th Pay Commission | सर्व्हिस आणि रिटायर्ड कर्मचार्‍यांसाठी आली मोठी खुशखबर, 1 जुलैपसून लागू होणार सर्व नियम