PM नरेंद्र मोदींकडून 20 लाख कोटीच्या ‘आत्मनिर्भर’ विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशातील काही राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 24 मार्चपासुन संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. सध्या लॉकडाऊन 3 चालू असून तो 17 मे ला संपणार आहे.


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज पुन्हा देशाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी भारताला आत्मनिर्भर बनविण्यावर भर दिला तसेच जगातील सद्यपरिस्थिती सांगितली. भारत आत्मनिर्भर बनू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितलं. अर्थव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी व्यवस्था (सिस्टीम), डेमोग्राफी आणि डिमांड या 5 गोष्टींवर आत्मनिर्भरता अवलंबून असते असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारत अभियानासाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 20 लाख कोटीच्या आर्थिक विशेष पॅकेजची पीएम मोदींनी घोषणा केली. सन 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला एक नवी दिशा देतील. जमीन, कामगार, लिक्वीडीटी यावर भर दिला आहे. सर्व उद्योगांसाठी हे पॅकेज असणार आहे.

आपल्याला वाचायचंय आणि पुढं देखील जायचं आहे. आपल्याला आपला संकल्प आणखी मजबुत करायचा आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासुन ऐकत आलो आहोत की 21 वं शतक भारताचं आहे. कोरोनाच्या संकटानंतर जगभरात जी अस्थिरता वाढतेय ती आपण पाहतोय. 21 वं शतक भारताचं होवो याची जबाबदारी आपल्यावर आहे. जगभराची आर्थिक स्थिती एकच सुचतीय ते म्हणजे आत्मनिर्भर भारत होय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना अनेक गोष्टींचा उलघडला केला. भारतात आज घडली दररोज 2 लाख पीपीई किट आणि 2 लाख एन-95 मास्कचं उत्पादन होत आहे. आज जगभरात आत्मनिर्भर शब्दाचा अर्थ पुर्णपणे बदलला आहे. भारताच्या प्रगतीमध्ये जगाची प्रगती सामील आहे.
उद्यापासून अर्थ मंत्री या विशेष आर्थिक पॅकेजबाबत सविस्तर माहिती देतील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हे विशेष आर्थिक पॅकेज हे देशातील मजुर, मध्यमवर्गीय, नोकरदार, व्यावसायिक, नियमीत कर भरणार्‍यांसाठी, उद्योगपतींसाठी तसेच भारतातील समाज व्यवस्थेतील सर्वांसाठी आहे. आत्मनिर्भरता ही आत्मविश्वासावर अवलंबून आहे.  या पॅकेजमुळं भारतातील सर्व क्षेत्रातील क्षमता आणि क्वॉलिटी वाढणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

ही बातमी अपडेट होत आहे.