राम मंदिर भूमीपूजन : 11:30 ला आगमन, 2:20 ला प्रस्थान, PM मोदींचा ‘मिनिट-टू-मिनिट’ प्रोग्राम

अयोध्या : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्यामध्ये पोहचतील. रामाची नगरी या ऐतिहासिक प्रसंगासाठी सज्ज झाली आहे, सर्व सजावट आणि भूमीपूजनाची तयारी पूर्ण झाली आहे. सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, सोबतच कोरोना संकटामुळे गाईडलाइन्सचे पालन केले जात आहे. पीएम मोदी आपल्या अयोध्या दौर्‍यात सुमारे 3 तास येथे थांबतील, ज्यामध्ये मंदिर दर्शन, पूजा इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.

अयोध्यातील पंतप्रधानांचा पूर्ण कार्यक्रम…

* 5 ऑगस्ट सकाळी सुमारे 9.35 दिल्लीतून प्रस्थान

* 10:35 वाजता लखनऊ एयरपोर्टवर लँडिंग

* 10:40 वाजता हेलिकॉप्टरने अयोध्यासाठी प्रस्थान

* 11:30 वाजता अयोध्याच्या साकेत कॉलेज हेलीपॅडवर लँडिंग

* 11:40 वाजता हनुमानगढीला पोहचून 10 मिनिट दर्शन-पूजा

* 12 वाजता राम जन्मभूमी परिसरात पोहणार

* 10 मिनिटात रामलला विराजमानचे दर्शन-पूजा

* 12:15 वाजता रामलला परिसरात पारिजात वृक्षारोपण

* 12:30 वाजता भूमीपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ

* 12:40 वाजता राम मंदिर आधारशिला स्थापना

* 02:05 वाजता साकेत कॉलेज हेलीपॅडसाठी प्रस्थान

* 02:20 वाजता लखनऊसाठी हेलिकॉप्टरने उड्डाण

* लखनऊहून दिल्लीसाठी रवाना

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद मोदी अनेकदा जनसभेसाठी अयोध्येत आले, परंतु रामललाचे दर्शन घेतले नव्हते. आता जेव्हा ते येत आहेत ते थेट मंदिराची वीट रचण्यासाठी येत आहेत. कोरोना संकटामुळे या कार्यक्रमात खुप कडक धोरण अवलंबले जात आहे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क घालणे आणि सतत सॅनिटायजेशन करणे, अशी काळजी घेणे बंधनकारक आहे.

भूमीपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान एक व्यासपीठ बनवले जाईल, ज्यावर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, राम मंदिर ट्रस्टचे नृत्यगोपाल दास उपस्थित असतील. याशिवाय एकुण 175 महत्वाच्या लोकांना आमंत्रण पाठवले आहे, जे या कार्यक्रमाला उपस्थित असतील.

भूमीपूजन कार्यक्रमासाठी बाबरी मस्जिदचे पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांना सुद्धा आमंत्रण पाठवले आहे, सोबतच अन्य प्रमुख संतांना बोलावण्यात आले आहे. सर्वांना मंगळवारी रात्रीच अयोध्यामध्ये पोहचायचे आहे. मंगळवारी अयोध्याच्या सीमा सील करण्यात येणार आहेत. ट्रस्टकडे या खास प्रसंगी देशाच्या विविध भागातून, मंदिर आणि पवित्र स्थानांची माती, नद्यांचे जल पोहचले आहे.