सावधान ! ‘कॅश’चे व्यवहार करताना ‘या’ 9 नियमांचं उल्लंघन केल्यास थेट ‘नोटीस’ अन् भरभक्कम ‘दंड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ७३ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले आणि अनेक मुद्यावर भाष्य केले. त्यातच एक होते डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचे धोरण. मोदी सरकारने कायमच डिजिटल व्यवहारांना प्रोस्ताहन दिले आहे. आता देखील डिजिटल व्यवहारांवर भर देण्याची घोषणा केली आहे. परंतू रोख विरहित व्यवहारासाठी सरकार अधिक कडक नियम करण्याचे ठरवले आहे.

रोख व्यवहार करताना या ९ गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर या नियमांचे पालन करण्यात आले नाही तर तुम्हाला दंड ठोठवला जाऊ शकतो. यामुळे आयकर विभागाची नोटीस देखील तुम्हाला येऊ शकते.

१. प्रॉपर्टीची म्हणजेच जमिन, संपत्तीचे व्यवहार रोखीने करण्यास बंदी –

प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे व्यवहार पारदर्शी असणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमानुुसार २०,००० रुपयांपेक्षा अधिक रोखीचे व्यवहार झाल्यास १०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो.

२. चालू खात्याचे (करंट) नियम –

एका वर्षात लाख रुपयांहून अधिक रक्कम बचत खात्यात जमा केल्यास अॅन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये केस दाखल करण्यात येईल. जर ५० लाख रुपयांहून अधिक रक्कम चालू खात्यात असल्यास आयकर विभाग तुमच्यावर लक्ष ठेवून असेल.

३. बँकेत पैसे ठेवण्यास मर्यादा –

बँकेत कितीवेळा किती रक्कम जमा करावी यावर कोणतेही बंधन नाही, परंतू त्याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. बचत खात्यात जर तुम्ही ५० हजार आणि त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करणार असाल तर पॅन कार्ड दाखवणे आवश्यक आहे.

४. बँक खात्यातील किती रक्कम काढू शकतात, त्यावर लागणारा टॅक्स –

स्वत:च्या बँक खात्यात कितीही पैसे काढले तरी त्यावर कर लागणार नाही. परंतू जर १ कोटीहून अधिक रक्कम काढल्यास त्यावर TDS लागेल.

५. घरात रोख रक्कम ठेवण्यावर बंधन –

घरात किती रोख ठेवावी यासाठी कोणतेही बंधन नाही परंतू इतकी रक्कम कुठून आली याबाबतचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. यावर योग्य स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत तर १३७ टक्के दंड ठोठावला जाऊ शकतो.

६. रक्कम भेट देऊ शकतात –

फक्त नातेवाईकांना तुम्ही २ लाख रुपयापर्यंत रोख रक्कम देऊ शकतात. आयकर विभागाने केलेल्या व्याख्येनुसार तुम्ही नातेवाईक खेरीज इतरांना ५०, ००० पेक्षा जास्त रक्कमेचे रोख गिफ्ट देऊ शकत नाही.

७. भेट म्हणून रोख रक्कम देता येते –

२ लाख रुपयांपेक्षा कमी रोख रक्कम असल्यास गिफ्ट म्हणून देऊ शकतात. परंतू त्यापेक्षा अधिक रक्कम गिफ्ट म्हणून देता येणार नाही, तसेच त्यापेक्षा अधिक रोख रक्कम असल्यास त्यावर १०० टक्के दंड ठोठावण्यात येईल.

८. लग्नाचा खर्च रोखीत करता येईल ?-

लग्नाचा खर्च रोखीने करण्यावर कोणतेही बंधन नाही. परंतू कोणत्याही एकाच व्यापाऱ्याकडून २ लाख रुपयांपर्यंतची खरेदी केल्यास आयकर विभाग तुमच्याकडील रोखींच्या पैशांची चौकशी करु शकतात. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो.

९. दान रोख रक्कमेमध्ये करु शकतो का?

दानाची रक्कम रोखीने देण्यावर बंधन आहे. एका वेळी अधिकाधिक तुम्ही २,००० रुपयांपर्यंत रोख रक्कम दान करुन शकतात. त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दान केल्यास तुम्हाला ८० जी अंतर्गत करसवलत मिळणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like