लेहमध्ये गरजले मोदी, म्हणाले – ‘शौर्य ही शांततेची पुर्व शर्थ असते’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी लेह येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींची ही भेट अचानक झाली, ज्यामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले. पीएम मोदी यांच्यासह चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिन रावतही उपस्थित होते. येथे पीएम मोदींना सेना, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीवरील वास्तवाची माहिती दिली. मेपासूनच चीनच्या सीमेवर तणावात्मक परिस्थिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नीमूच्या फॉरवर्ड पोस्टवर पोहोचले. येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना घटनाक्रमाची माहिती दिली. पीएम मोदींनी सैन्य, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवादही साधला. यापूर्वी केवळ सीडीएस बिपिन रावत हेच या दौर्‍यावर येणार होते, पण पीएम मोदींनी स्वत: जाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहच्या वॉर मेमोरियल हॉल ऑफ फेममध्ये पोहोचून सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर त्यांनी सैन्य रुग्णालयात जखमी सैनिकांची भेट घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांना संबोधित केले. त्यांनी भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे कौतुक केले.

पीएम मोदींनी सैनिकांना केले संबोधित

मोदी म्हणाले की, जेव्हा देशाचे संरक्षण तुमच्या हातात आहे, तुमच्या ठाम हेतूमध्ये आहे, तेव्हा केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला विश्वास आहे. तुमची बाजू त्या पर्वतासारखी मजबूत आहे, जे तुमच्या आजूबाजूला आहे. आसपासच्या पर्वतांप्रमाणे तुमची इच्छाशक्ती अटळ आहे.

मोदी म्हणाले की, आपल्या भारतमातेसाठी तुमचे शौर्य, सन्मान आणि समर्पण अतुलनीय आहे. ज्या कठीण परिस्थितीत ज्या ऊंचीवर तुम्ही भारताची ढाल म्हणून तिचे रक्षण आणि सेवा करत आहात, त्याची स्पर्धा संपूर्ण जगात कोणीही करू शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी जे शौर्य दाखवले आहे, त्याने हा संदेश जगभरात दिला आहे की भारताची शक्ती काय आहे. मी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना आज पुन्हा श्रद्धांजली वाहतो. त्यांचे सामर्थ्य, त्यांच्या युद्धाच्या आक्रोशाने पृथ्वी अजूनही त्यांचा जयजयकार करत आहे.

भारतीय सैन्य दलाच्या जवानांचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, १४ कोरच्या धैर्याची चर्चा सर्वत्र आहेत. जगाने तुमचे अदम्य धैर्य पाहिले आहे. तुमच्या शौर्यकथा घरोघरी ऐकल्या जात आहेत. भारताच्या शत्रूंनी तुमची आग आणि राग पाहिला आहे.

भारतीय लष्कराच्या सैनिकांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, विस्तारवादाचे युग संपले आहे. आता विकासवादाची वेळ आली आहे. वेगाने बदलणार्‍या काळात विकासवादच प्रासंगिक आहे. विकासावादासाठी संधी आहे आणि विकासवाद हाच भविष्याचा आधार आहे.

सैनिकांमध्ये दिसला उत्साह

पीएम मोदी यांच्यासह सीडीएस बिपिन रावत यांच्याशिवाय लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे देखील लेहमध्ये हजर आहेत. गेल्या दोन महिन्यांत लष्करी व मुत्सद्दी पातळीवर चीनबरोबर अनेक पातळ्यांवर चर्चा झाली आहे, ज्यात वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र याबाबत अद्याप कोणताही ठाम निर्णय झालेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सैनिकांमध्ये पोचले, तेव्हा तिथे उपस्थित सैनिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम अशी घोषणाबाजी केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मोदींच्या लेह दौर्‍याचे कौतुक केले आणि म्हणाले कि भारताच्या सीमा सैन्याच्या हाती सुरक्षित आहेत.

निमु पोस्ट ही समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर आहे, जी जगातील सर्वात उंच आणि धोकादायक पोस्ट म्हणून ओळखली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी या भेटीदरम्यान १४ कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याशिवाय बिपिन रावत यांच्यासह सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उत्तर आर्मी कमांडचे लेफ्टनंट जनरल वायके जोशी, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हेही उपस्थित होते.

रद्द झाला होता राजनाथ सिंह यांचा दौरा

मेपासूनच चीनसह सीमेवर तणाव आहे आणि सीमेवर सतत गंभीर परिस्थिती आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तेथे पोहोचणे सर्वांनाच चकित करत आहे.

याआधी शुक्रवारी केवळ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेच लेह येथे जाणार होते, परंतु गुरुवारी त्यांचा कार्यक्रम बदलण्यात आला. मग केवळ बिपीन रावत हे लेहला जातील असा निर्णय घेण्यात आला.

अधिकाऱ्यांसह होणार होती बैठक

शुक्रवारी सीडीएस बिपिन रावत यांची उत्तर कमांड आणि १४ कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांसह बैठक होणार होती. यावेळी चीनबरोबरचे सध्याचे तणाव, सीमा परिस्थितीचा आढावा घेणार होते. यापूर्वी लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे देखील लेह येथे गेले होते, तेथे त्यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या सैनिकांची भेट घेतली होती.

याशिवाय सेना प्रमुखांनी पूर्व लद्दाखच्या पुढच्या पोस्टवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. सैन्यप्रमुखांनी सैनिकांना सांगितले की, तुमचे काम उत्कृष्ट झाले आहे, पण हे काम अजून पूर्ण झालेले नाही.