PM मोदींची घोषणा ! समुद्र आणि आकाशात भारत – रशिया राहणार सोबत, झाले 30 पेक्षा अधिक करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी व्लादिवोस्तोक मधील इस्टर्न इकॉनॉमिक फोरम मध्ये त्यांनी उपस्थितांसमोर भाषण दिले. यादरम्यान मोदी यांनी भारत -रशिया संबंधावर वक्तव्य केले आणि दोन्ही देशांच्या मैत्रीसंबंधात चर्च करून आपले धेय्य धोरण समोर ठेवले. प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, या कार्यक्रमासाठी व्लादिमिर पुतीन यांनी मला निवडणुकांच्या आधीच निमंत्रण दिले होते.

भारतातील १३० करोड लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी म्हणाले की, माझे सरकार ऍक्ट ईस्ट धोरणावर काम करत आहे. या अंतर्गतच भारत आणि रशिया या देशांमध्ये ३० पेक्षा अधिक व्यापारिक करार झाले आहेत.

दोन्ही देशांच्या संबंधावर वक्तव्य केले
प्रधानमंत्री मोदी कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत रशियाबद्दल जाणून घेता आले. या गोष्टीमुळे मी खूपच प्रभावित झालो. भारताचे आणि पूर्वेकडील देशांचे संबंध अतिशय जुने असून तर खूप मजबूत आहेत. भारत हा एकमेव देश आहे ज्याने व्लादिवोस्तोक मध्ये भारतीय दूतावास सुरु केला आहे. या ठिकाणी भारताने एनर्जी सेक्टर हे स्थान दोन्ही देशांसाठी एक महत्वाचे स्थान होऊ शकेल. तसेच सोव्हियत रशियाच्या वेळीही भारत आणि रशिया संबंध अतिशय मजबूत होते.

फार ईस्ट साठी भारत देणार १ बिलियन डॉलर
मोदी म्हणाले की, भारत आणि रशिया एकत्र आल्यानंतर विकासाची गती १+१=११ बनवण्याची संधी आहे. मध्यंतरी भारतातून अनेक नेते इथे आलं आणि त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे. पर्यावरणाला वाचवण्यासाठी भारत अनेक पावले उचलत आहे. मोदी म्हणाले, पूर्वेकडील भागात विकास करण्यासाठी भारत १ बिलियन डॉलरचे लाईन ऑफ क्रेडिट देणार आहे.

भारतासाठी समोर ठेवले आपले मिशन
कार्यक्रमात मोदी म्हणाले की, भारत रशिया सोबत चालू इच्छितो. भारतात आम्ही सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या सोबत पुढे मार्गक्रमण करत आहोत. २०२४ पर्यंत भारत ५ ट्रिलियन डॉलर बनवण्याच्या दिशेने चालत आहे. सोबतच मोदी यांनी रशियाच्या ११ राज्यपालांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. दोन्ही देश मिळून आकाशाचे अंतर पारू करून आणि समुद्राची खोली मोजूत. पुढे मोदी म्हणाले की, लवकरः व्लादिवोस्तोक आणि चेन्नई दरम्यान भारत आणि रशियाचे शिप चालतील. भारत नेहमी दुसऱ्या देशांच्या सीमांचा सन्मान करतो. या वर्षी भारत महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करत आहे. टॉल्स्टॉय आणि गांधीजी यांची एक दुसऱ्यावर एक वेगळीच छाप होती. त्यामुळचे भारत रशिया येत्या काळात अधिक वृद्धिंगत होण्यास मदत मिळणार आहे.