PM मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, ‘सास भी कभी बहू थी’,अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातून एकूण 22 जणांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला. यात 10 मुली आणि 12 मुलांचा समावेश होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्रीय बाल शौर्य विजेत्या मुलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुलांना यशस्वी जीवनाचा मंत्र दिला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यादेखील यावेळी उपस्थित होत्या. मोदींनी मुलांशी विविध मुद्द्यावर गप्पा मारल्या. मुलांनी मोदींना अनेक प्रश्नही विचारले.

एका मुलानं पीएम मोदींना प्रश्न विचारला की, तुम्हाला तुमच्या आईची आठवण येत नाही का ? यावर मोदी म्हणाले, “मला जेव्हा आईची आठवण येते तेव्हा माझा सर्व थकवा दूर होतो.” यावेळी बोलताना नरेंद्री मोदी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना लोकप्रियता मिळालेल्या क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेचाही उल्लेख केला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत स्मृती इराणींनादेखील हसू अनावर झालं.

मुलांशी संवाद साधताना मोदींनी मुलांना यशस्वी कानमंत्र दिला. मोदींना मुलांना देशाचं भविष्य संबोधलं आणि म्हणाले, “तुमच्या शौर्याची गोष्ट ऐकून माझ्यासह प्रत्येकाला अभिमान वाटत आहे. तुम्ही जेव्हा कधी काही यश प्राप्त कराल तेव्हा तुमचं ध्येय काय आहे हे विसरू नका. संधीच्या शोधात रहा. मेहनत करण्यापूर्वी अजिबात घाबरू नका.” असा सल्लाही मोदींनी मुलांना दिला.

जेव्हा आई मुलांना दूध घेऊन येते तेव्हा लवकरात लवकर दूध प्यायला सांगते. तेव्हा काही तरी टीव्ही मालिका सुरू असते. हो की, नाही असा प्रश्न मुलांना विचारल्यानंतर मुलांनी हो असं उत्तर दिलं. यावर मोदी म्हणाले, कोणती मालिका क्यों की सास भी कभी बहू थी बरोबर ना. यानंतर स्मृती इराणींसह मुलांनाही हसू अनावर झालं.

फेसबुक पेज लाईक करा –