तामिळनाडूतीन वधूपित्यानं थेट पंतप्रधान मोदींना दिलं निमंत्रण, मिळालं ‘असं’ उत्‍तर

चेन्नई :  वृत्तसंस्था –  लग्न समारंभाचे निमंत्रण सहसा आपण आपल्या ओळखीतल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देत असतो. मात्र तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. त्यामुळे ही व्यक्ती चांगलीच चर्चेत आली आहे. मूळचे वेल्लोर चे राहणारे पूर्व मेडिकल संशोधक तथा सुपरवाजर टीएस. राजशेखरन यांच्या मुलीचा विवाह येत्या ११ सप्टेंबर रोजी आहे. राजशेखरन यांनी आपली मुलगी राजश्रीच्या लग्नामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना येण्याचे निमंत्रण दिले आहे.
प्रधानमंत्र्यांनी पत्राच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा 
वेल्लोरमधील या परिवाराला प्रधानमंत्री कार्यालयाकून आपण दिलेल्या लग्नाच्या निमंत्रणाला उत्तर मिळेल याची कसलीही अपेक्षा नव्हती. मात्र मागच्या शनिवारी (७ सप्टेंबर ) ला या परिवाराने  दिलेल्या निमंत्रणाला प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून पत्राला उत्तर मिळाले आहे. या पत्रामध्ये असे लिहिले आहे की, या पवित्र आणि पावन क्षणी येण्याचे निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद.  हे जाणून खुप आनंद झाला की, तुमच्या मुलीचे अर्थात राजश्रीचे लग्न डॉ.सुदर्शन यांच्यासोबत होत आहे. तसेच या पत्रामध्ये वधू-वरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देताना असे लिहिले गेले आहे की, दोघांचे जीवन मंगलमय आणि सुखमय व्हावे.
‘या’ परिवाराकडून ‘हे’ पत्र फ्रेम करून ठेवले जाणार 
प्रधानमंत्री कार्यालयाकडून मिळालेले हे पत्र आता या परिवाराकडून आपल्या घरी फ्रेम करून ठेवले जाणार आहे. वेल्लोर मधील या परिवाराला याची पूर्ण जाणीव होती की, प्रधानमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम आधीच ठरलेले असतात. त्यांना येथे येणे जरी शक्य नसले तरी त्यांनी आमच्या पत्राला उत्तर दिले आहे. हे आमच्यासाठी एकदम आश्चर्यजनक आहे. येत्या ११ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मोदी हे मथुरा मध्ये असणार आहेत. तेथे ते नॅशनल डिजीज कंट्रोल प्रोग्राम (NADCP) लॉन्‍च करणार आहेत.
Loading...
You might also like