जेव्हा चांद्रयान लॉन्च होत होतं, त्यावेळी नरेंद्र मोदी अशाप्रकारे टाळ्या वाजवत होते, पहा फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने अंतराळ मोहिमेत आणखी एक मोठे यश मिळवले आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन म्हणजेच इस्रोने काल आंतराळात ऐतिहासिक कामगिरी करत Chandrayaan-२ चे यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा मधील सतीश धवन स्पेस सेंटर मधून दुपारी या यानाने उड्डाण घेतले तेव्हा साऱ्या देशवासीयांच्या नजरा या क्षणाकडे लागल्या होत्या. कारण उड्डानानानंतरचे काही मिनिट फार महत्वाचे असतात. ज्यावेळी संपूर्ण भारत या ऐतिहासिक क्षणांचा साक्षिदार होत होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हा क्षण आपल्या कार्यालयातून पाहत होते.

उड्डाणावेळी वाजवल्या टाळ्या

यानाने उड्डाण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आनंदित होऊन टाळ्या वाजवल्या. विशेष म्हणजे संपूर्ण देशाचे लक्ष या ऐतिहासिक क्षणाकडे लागले असताना पंतप्रधान मोदींचा देखील श्वास काही काळ रोखला गेला होता. खासगी न्यूज एजन्सीने प्रसारित केलेल्या काही फोटोंमध्ये आपण पाहू शकतो कि, आपल्या खुर्चीला पाठीमागून पकडून उभे आहेत. मात्र जसे यानाने उड्डाण घेतले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. यानंतर त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत सर्वांना या यशस्वी कामगिरीच्या शुभेच्छा दिल्या.

आरोग्यविषयक वृत्त –