PM मोदींच्या ‘सरप्राइज व्हिजीट’मुळं चीन-पाकला ‘जबरदस्त’ आणि जगाला ‘हा’ मोठा संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अचानक लेहला गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या आश्चर्यकारक भेटीने चीनसह संपूर्ण जगाला मोठा संदेश मिळाला आहे. डिफेन्स एक्सपर्ट्सनुसार, पीएम मोदींनी लेह येथे जाऊन एक मोठे पाऊल उचलले आहे आणि चीनला आपण मागे हटणार नसल्याचा संदेश दिला आहे.

सेवानिवृत्त मेजर जनरल ए.के. सिवाच म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने चीनला स्पष्ट संदेश मिळला आहे की आपण मागे हटणार नाही. जर चिनी सैनिक एलएसीवर तैनात असतील, तर आपलेही सैनिक एलएसीवर तैनात असतील. आम्ही कोणत्याही बाबतीत तडजोड करणार नाही.

संरक्षण तज्ञ रिटायर्ड ब्रिगेडिअर विक्रम दत्ता म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लेह दौर्‍यामुळे फ्रंटलाइनवर तैनात असलेल्या सैन्याचे मनोबल वाढले आहे. पीएम मोदींचे सैन्याशी खूप चांगले संबंध आहेत. यामुळे सैन्य कर्मचारी आणि अधिकारी यांना पूर्ण ताकद, मनोबल आणि शक्ती मिळेल, जेणेकरून ते एलएसीवर चीनशी अधिक चांगली स्पर्धा करू शकतील.

सेवानिवृत्त ब्रिगेडियर विक्रम दत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्राऊंड झिरोवर येण्याबाबत म्हणाले की, यामुळे पंतप्रधानांना जमीनीवरील परिस्थितीची माहिती मिळेल. तसेच सद्य परिस्थिती काय आहे हेही त्यांना समजू शकेल. तसेच कोणतेही सैन्य जेव्हा युद्धक्षेत्रात आपल्या पंतप्रधानांना पाहते, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतो.

त्याचबरोबर सेवानिवृत्त मेजर जनरल शशी अस्थाना म्हणाले की, चीनबरोबर आतापर्यंत लष्करी चर्चा झाली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जमिनीवरील परिस्थिती समजेल आणि चीनशी आतापर्यंत काय चर्चा झाली आहे, हे त्यांना कळेल. सोबतच भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा घेतील. चीन मागे हटण्याबाबत भलेही सहमत असेल, पण आपण चीनवर विश्वास ठेवू शकत नाही.