संरक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत PM नरेंद्र मोदींनी घेतली विशेष बैठक

पोलिसनामा ऑनलाईन – अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि कोरोना व्हायरसच्या संकटकाळादरम्यान देशातील संरक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आर्म्ड फोर्सेसच्या छोट्या आणि मोठ्या कालावधीतील गरजा लक्षात घेउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी थेट परकीय गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण क्षेत्र आणि एअरोस्पेसमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यावर चर्ता करण्यात आली.

संरक्षण क्षेत्रा आणि एअरोस्पेस क्षेत्राात भारतात अधिक सक्षम बनवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांनी या क्षेत्रातील सुधारणांवरही भर देण्याच्या सुचना यावेळी केल्या. बैठकीत संरक्षण क्षेत्रात होणार्‍या खर्चांमध्ये कपात करण्याच्याही सुचनाही पंतप्रधानांनी केल्या. पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रात मेक इंन इंडियाला चालाना देणे आणि स्टेट ऑफ आर्ट तंत्रज्ञानासोबत संरक्षण क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावरही भर दिला. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर आणि सरकारमधील अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते.