Lockdown 3.0 : CM उध्दव ठाकरेंसह ‘या’ 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची केली मागणी, 17 मे पुर्वी PM मोदी घेणार निर्णय

वृत्त संस्था – कोरोनाबाधितांच्या वाढती संख्या आणि इतर मुद्यांवर तसेच देशाला लॉकडाऊन बाहेर काढण्यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगव्दारे चर्चा करीत आहेत. कोरोना महामारीनं थैमान घातल्यापासुन पीएम मोदींनी पाच वेळा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह बिहार, पंजाब, पश्चिम बंगाल आणि तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 17 मे रोजी लॉकडाऊन संपणार असून लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत पीएम मोदी हे त्यापुर्वी निर्णय घेतील.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी लॉकडाऊन वाढविण्याच्या मागणीचं समर्थन केले. प्रवासी रेल्वे गाडया सुरू केल्यास कोरोनाचं संक्रमण वाढण्याचा धोका असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली. लॉकडाऊन वाढविल्याशिवाय पुढं जाणं कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी देखील लॉकडाऊन वाढविण्याचं समर्थन केलं. लोकांचा जीव वाचवणं हे गरजेचं असल्याचं ते म्हणाले. 3 महिन्यांच्या आर्थिक मदतीची देखील त्यांनी मागणी केली तसेच कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासंदर्भात देखील त्यांनी रणनीती आखण्याची मागणी केली. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी देखील लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली. लॉकडाऊन वाढवला नाही तर बाहेरून लोक येतील आणि त्यामुळे कोरोना व्हायरसचं संकट अधिक गडद होईल असे ते म्हणाले.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामींनी चेन्नईमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचं सांगितलं. 31 मे पर्यंत तामिळनाडूमध्ये रेल्वे सेवाला परवानगी देऊ नये असे ते म्हणाले. 31 मे पर्यंत विमान सेवा देखील चालु करू नयेत अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहांनी आरोग्य सेतू हे अ‍ॅप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा असे सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.