व्हॅक्सीनेशनच्या दरम्यान संपूर्ण दिवसभर अलर्ट होते PM मोदी, राज्यांकडून रियलटाइम डाटाचे करत होते मॉनिटरिंग

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी शनिवारी देशात जगातील सर्वात मोठ्या कोरोना व्हॅक्सीनेशन अभियानाचा शुभारंभ केला, शिवाय पूर्णवेळ याच्या मॉनिटरिंगची सूत्र स्वत: सांभाळली. सेव्हन, लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानातून त्यांनी देशातील 3,351 केंद्रांवर लक्ष ठेवले. सर्व राज्यांमधील व्हॅक्सीनेशनच्या कामाचे प्रत्येक अपडेट ते घेत होते. सर्व राज्यांमधील केंद्रांकडून त्यांनी व्हॅक्सीनेशनचा रियलटाइम डेटा घेतला.

पंतप्रधान मोदी यांच्या या मॉनिटरिंगचा परिणाम हा झाला की, प्रत्येक केंद्रावर कामाची लगबग होती. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, पहिल्याच दिवशी तीन हाजार पेक्षा जास्त केंद्रांवर सायंकाळी 7 वाजेपर्यंत 1,65,714 लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली. मोदी यांनी शनिवारी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगच्या माध्यमातून देशातील 3351 केंद्रांवर व्हॅकसीनेशन अभियानाची सुरूवात केली. अभियान सुरू झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण दिवसभर पंतप्रधान मोदी अलर्ट मोडमध्ये होते.

पंतप्रधान मोदी व्हॅक्सीनेशनच्या प्रक्रियेबाबत सर्व केंद्रांकडून रियल टाइम आकडे सुद्धा मागत होते. जेणेकरून कोणत्या राज्यात कोरोना व्हॅक्सीनची काय स्थिती आहे हे समजावे. सूत्रांनुसार, पंतप्रधान मोदी यांनी व्हॅक्सीनेशन मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या केंद्रांचे कौतूकसुद्धा केले. त्यांनी व्हॅक्सीनेशन अभियानाशी संबंधीत प्रमुख अधिकार्‍यांना सतत केंद्रांशी संपर्कात राहण्याचे निर्देश सुद्धा दिले.

तत्पूर्वी व्हॅक्सीनेशन अभियानाचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, इतिहासात इतक्या मोठ्या स्तरावरील अभियान अगोदर कधीही चालवण्यात आले नाही. जगातील 100 पेक्षासुद्धा जास्त देश असे आहेत ज्यांची लोकसंख्या 3 कोटीपेक्षा कमी आहे, तर भारत व्हॅक्सीनेशनच्या आपल्या पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांना व्हॅक्सीनेशन करत आहे. दुसर्‍या टप्प्यात 30 कोटी लोकांना व्हॅक्सीन दिली जाईल, जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, त्यांना या टप्प्यात व्हॅक्सीन दिली जाईल.