मोदी बनले ‘किंग ऑफ फेसबुक’; ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांनाही टाकले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या लोकसभा निवडणुकींमध्ये प्रचार करताना सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ही सुरुवात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तेही भाजपने त्यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला. त्यामुळे सोशल मीडियावर मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून मोदींचे नाव पुढे आले आहे. महत्वाचे म्हणजे मोदींनी यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे. तसंच ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनाही मोदींनी मागे टाकले आहे.

२०१९ च्या वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला ४.३५ कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्या माध्यमातून जवळपास १.३७ कोटी लाईक्स आहेत. मोदींना हा मान मिळाल्यानंतर मोदींनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर आहे. ट्रम्प यांच्या पेजला २.३० कोटी लाईक्स आहेत. तर तिसऱ्या स्थानावर क्वीन रानिया यांचा नंबर लागतो. जॉर्डनचे सुलतान अब्दुल्लाह यांच्या पत्नी असलेल्या रानिया यांना 1.69 कोटी लाईक्स आहेत.

वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक हा अहवाल दरवर्षी तयार केला जातो. या अहवालावर फेसबुकवर सर्वाधिक वेळ कोण घालवते हेही सांगण्यात येते. त्यानुसार ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो हे सर्वाधिक वेळ फेसबुकवर घालवतात हे समोर आले आहे.

दरम्यान, हा अहवाल तयार करण्यासाठी फेसबुकवरील एका टूलच्या मदतीने ९६२ फेसबुक पेजचे एक्टिविटीचं विश्लेषण करण्यात येते. या पेजमध्ये देशातील प्रमुख व्यक्ती किंवा त्यांचे सरकार यांचा समावेश असतो. त्यांच्यातील तुलना करून हा अहवाल काढला जातो.

You might also like