PM Narendra Modi Networth | पंतप्रधान मोदींची संपत्ती किती? जाणून घ्या

नवी दिल्ली : PM Narendra Modi Networth | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. मोदीजींचा जन्म गुजरातमधील वडनगर येथे १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. ते २०१४ पासून देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक योजना लागू केल्या, ज्यांची चर्चा सातत्याने होत असते. पीएम मोदींना किती पगार मिळतो आणि त्यांची संपत्ती किती आहे, याबाबत जाणून घेऊया. (PM Narendra Modi Networth)

भारताच्या पंतप्रधानांचा पगार वर्षाला सुमारे २० लाख रुपये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून सुमारे २ लाख रुपये महिना पगार आहे. मूळ वेतनाव्यतिरिक्त, पंतप्रधानांना मिळणाऱ्या पगारामध्ये दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतर अनेक भत्ते यांचा समावेश होतो. (PM Narendra Modi Networth)

पीएमओ कार्यालयाने २०२२ मध्ये जाहीर केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या तपशीलानुसार, मोदी यांच्याकडे एकूण २.२३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पीएमओच्या वेबसाइटनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २.२३ कोटी रुपयांची संपत्ती बँक खात्यांमध्ये जमा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.
गुजरातमधील गांधीनगर येथे त्यांच्या मालकीची जमीन होती, जी त्यांनी दान केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबर २००२ मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती.
तिसरा हिस्सेदार म्हणून त्यांचा यात सहभाग होता.
परंतु, स्थावर मालमत्तेचा सव्र्हे क्रमांक ४०१/ए वर आता त्याच्याकडे कोणतेही मालकी हक्क नाहीत,
कारण त्यांनी आपला हिस्सा दान केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही. त्यांच्याकडे १.७३ लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.
नरेंद्री मोदी यांच्याकडे पोस्ट ऑफिसची ९,०५,१०५ रुपयांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी)
आणि १,८९,३०५ रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav – Traffic Changes | गणपतीच्या आगमनानिमत्त पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग