सुरक्षेत ‘एक नंबर’ असणार्‍या ‘या’ स्वदेशी कारमधून PM मोदी करतात प्रवास, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   26 जानेवारी 2020 रोजी संपूर्ण देशात 72 वा गणराज्य दिवस साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी रोजी सकाळी नॅशनल वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते राजपथला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा राजपथावर पोहोचले तेव्हा सर्वांचे लक्ष विशेषकरून दोन गोष्टींनी वेधून घेतले होते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल रंगाची पगडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजपथावरील Range Rover Sentinel वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एन्ट्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे Range Rover Sentinel या कारमधून प्रवास करतात. या कारची ओळख म्हणजे ही कार जगातील सर्वात सुरक्षित कार पैकी एक आहे.

या कारमध्ये सुरक्षेच्या बाबतीत अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. ही एक आर्मर्ड कार आहे. ही कार इतकी सुरक्षित कार आहे की या कारवर बॉम्ब फेकला किंवा गोळ्या झाडल्या तरीही त्याचा या कारवर काही फरक पडत नाही. आयईडी ब्लास्ट केल्यावरही कारला काहीच होऊ शकत नाही. तसेच गॅस आणि केमिकल हल्ला देखील ही कार सहन करू शकते. विशेष म्हणजे कारचे टायर डॅमेज झाल्यानंतरही 100 किलोमीटर पर्यंत ही कार धावू शकते आणि अडचणीच्या वेळी चिखल, पाणी, दगडातूनही सहज धावू शकते.

कारमध्ये आहे बाहुबली इंजिन

Rnge Rover Sentinel ही कार केवळ सुरक्षेच्या बाबतीतच नाही तर या कारमध्ये पॉवर साठी Jaguar सोर्स्ड 5.0-लीटर, सुपरचार्ज्ड V8 इंजिन देण्यात आले आहे. या कारचे इंजिन 375 बीएचपीचे मॅक्सिमम पॉवर आणि 508 एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये प्रति तास 218 किलोमीटर इतकी टॉप स्पीड असून ही कार फक्त 5.3 सेकंदात प्रति तास 100 किलोमीटरचा वेग पकडू शकते.

ही कार मोठमोठे हल्ले देखील सहन करू शकते, ही कार बुलेटप्रूफ ग्लासने सज्ज आहे. या कारची संपूर्ण केबिन बुलेटप्रूफ आहे, यामुळे ही कार रॉकेटचा हल्ला देखील झेलू शकते. या कारमध्ये एग्झिटची सोय असून अडचणीच्या वेळी मोदी कारच्या बाहेर देखील सहज पडू शकतात. अधिक माहिती म्हणजे टाटा मोटर्स (Tata Motors) कडे Range Rover ची मालकी आहे. विशेष म्हणजे टाटा मोटर्स एक स्वदेशी कंपनी आहे. या कारच्या सर्व सुरक्षेची जबाबदारी या स्वदेशी कंपनीकडे आहे. या कारवर जेवढा खर्च होतो तो भारतीय कंपनीच्या खात्यात जातो.