Coronavirus : ‘लॉकडाऊन’मुळं झाला ‘लाभ’, सामुहिक प्रयत्नांचा दिसला परिणाम : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या देशातील परिस्थितीबद्दल आणि त्यामुळे २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊनसह इतर अनेक मुद्द्यांवर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले कि लॉकडाऊनमुळे देशाला फायदा झाला आहे. त्यांनी लॉकडाऊनवर राज्यांना संयम मंत्रीही दिले.

माहितीनुसार, या बैठकीत देशाला टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमधून बाहेर काढण्याच्या उपायांवर चर्चा झाली. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशात दोन टप्प्यांचा लॉकडाऊन लागू आहे. देशात कोरोना संकटाच्या सुरुवातीनंतर २२ मार्चपासून आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चार वेळा बैठक घेतली आहे.

या बैठकीत गृहराज्यमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या बैठकीला हजेरी लावली.

या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही हजेरी लावणार असून अलीकडे काही दिवसांमध्ये कोरोनाच्या मुद्यावरून केंद्र आणि बंगाल सरकार यांच्यात गोंधळ उडाला आहे. असे म्हटले जात होते की, या तणावामुळे ममता सभेला हजर राहणार नाहीत पण आज त्या पंतप्रधानांसमवेत बैठकीत हजर आहेत.