राष्ट्रवादीची झोप उडवणारा ‘तो’ तिहार जेलमध्ये ; मोदींचा हल्लाबोल

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा त्यांना आजकाल झोप का येत नाही. त्यांची झोप उडवणारा दिल्लीमधील तिहार जेलमध्ये अडकला आहे. अस म्हणत नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता हा नेमका कैदी कोण ? राष्ट्रवादीशी त्याचा काय संबंध असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मोदींची महाराष्ट्रातली दुसरी सभा आज गोंदियात झाली त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

मोदी म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांना काळजी लागून राहीली आहे की, तिहार जेलमध्ये जो आत गेला आहे, तो काही बोलला, तर काय होईल ? सगळं सत्य समोर येईल तो दिवस लांब नाही. पण मला सगळंच सांगायचं नाही, असेही ते म्हणाले.

पाच वर्षे यूपीए सरकारच्या चुका सुधारण्यातच गेली, असं सांगत तुमच्या सहकार्याने विकासाचा नवा हायवे तयार करण्याचं आश्वासनही मोदींनी यावेळी दिले.