जिगरबाज ! अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीनंतरही पाकिस्तानी ‘एअरस्पेस’मधून मायदेशी परतले PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रान्सच्या बिरिट्झ येथे झालेल्या जी-7 बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्नावर ट्रम्प कार्ड चालवले. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुबॉम्बची धमकी देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या या धमकीकडे दुर्लक्ष करत पंतप्रधान मोदी त्यांच्याच हद्दीतून मायदेशी परतले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात 22 ऑगस्टला संयुक्त अरब अमिराती (युएई), बहरीन आणि फ्रान्स दौऱ्यावर गेले होते. त्यांनी फ्रान्समधील बेरिट्झ शहरात जी-7 शिखर परिषदेतही सहभागी घेतला होता. या परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली.

काश्मीर प्रश्न हा केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यापुरता असल्याचे स्पष्ट करीत त्यात त्रयस्थ देशाने मध्यस्थी करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत फेटाळून लावली. मोदी यांच्याशी आपण रविवारी रात्री काश्मीर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. भारत आणि पाकिस्तानने हा प्रश्न स्वत:च सोडवावा, असे आपले मत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींसमक्ष पत्रकारांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युएई (संयुक्त अरब अमिराती) मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ जाएद’ देण्यात आला होता. भारत आणि युएई दरम्यान द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहरीनला भेट दिली. बहरीन सरकारने भारताविषयी सद्भावना दाखवत 250 भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली.

आरोग्यविषयक वृत्त –