‘संघ प्रचारक’ असताना मोदी म्हणाले होते की, ‘370 कलम हटाओ ‘आतंकवाद’ मिटाओ, देश बचाओ’ (फोटो)

श्रीनगर : वृत्‍तसंस्था – जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याची शिफारस मोदी सरकारने केली आहे. राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकदम जुना फोटो मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे. मोदी हे संघ प्रचारक असतानाचा तो आंदोलनातील फोटो आहे.

मोदी सरकारकडून जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याचा देखील प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आता जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश होणार आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर देशभरातील जनतेकडून मोठया प्रमाणावर मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर या निर्णयाचे काही ठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात येत आहे. केंद्र सरकारने कलम 370 कलम रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविला असून राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर नवे नियम लागू होणार आहेत.

पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना त्यांनी कलम 370 रद्द व्हावे यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलनातील मोदींचा मोठा सध्या मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यावेळी आंदोलनात लावण्यात आलेल्या बॅनरवर 370 कलम हटाओ आतंकवाद मिटाओ, देश बचाओ असं लिहीलं होतं. ज्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं ती आज पूर्ण झाली असून त्यावेळी आंदोलन करणारे मोदी आज पंतप्रधान आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –