PM मोदींनी महाबलीपुरमच्या बीचवर पायात चप्पल न घालता केली ‘साफसफाई’, स्वतः उचलला कचरा (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज शनिवार (12 ऑक्टोबर ) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू तटावरील महाबलीपूरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीचवर जाऊन सकाळी सकाळी पायात चप्पल न घालता  साफ सफाई केली. यावेळी बीचवरील कचरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलला. यासंदर्भातील एक व्हिडीओ स्वतः मोदींनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. यामध्ये मोदी लिहितात ही स्वच्छता मोहीम जवळजवळ अर्धा तास चालली. तसेच आपण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की आपली सार्वजनिक ठिकाने स्वच्छ राहतील. तसेच आपण फिट आणि निरोगी राहण्यावरही भर दिला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अनौपचारिक भेट ही याच ममल्लापुरम मध्ये झाली होती. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण आणि सफाई अभियान चालवण्यात आले होते.

मागच्या वर्षी चीनच्या वूहानमध्ये पहिल्यांदा या दोघांची अनौपचारिक भेट झाली होती. पंतप्रधान सध्या तामिळनाडूच्या महाबलीपूरममध्येच आहेत, जिथे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

Visit : Policenama.com

 

You might also like