PM Narendra Modi | ‘घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता…’, तपास यंत्रणांच्या कारवाईवरून मोदींचा विरोधकांवर निशाणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चार राज्यात भाजपच्या (BJP) विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भ्रष्टाचार (Corruption) करण्यात येणाऱ्या तपास (Investigation) यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात (BJP Headquarters) कर्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे, असे म्हटले. काही लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थांना बदनाम करत आहेत. घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत असल्याचे त्यांनी म्हटले.

 

 

आपल्या देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे. देशाच्या संपत्तीला लुटून आपल्या तिजोऱ्या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची आहे. भाजपने 2014 मध्ये प्रामाणिक सरकारचे आश्वासन देत निवडणूक (Election) जिंकली होती. आमचा प्रामाणिकपणा पाहून जनतेने 2019 मध्ये आणखी आशीर्वाद दिला. भ्रष्टाचार मुक्त भारत (Corruption Free India) करण्याची जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहे. पण तटस्थ असलेल्या संस्था भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतात तर हे लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थाना बदनाम करत आहेत. या लोकांना देशाच्या न्यायपालिकेवरही विश्वास नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

 

हे लोक कोणत्याही भ्रष्टाचारी व्यक्तीवर कारवाई झाली की त्याला धर्माचा (Religion), जातीचा (Caste) रंग देतात. कोणत्या माफियाविरुद्ध न्यायालयाने (Court) निर्णय दिला तर हे लोक त्याला धर्म आणि जातीसोबत जोडतात. मी सर्व प्रामाणिक लोकांना विनंती करु इच्छितो की अशा माफियांना आपल्या समाजातून, संप्रदायातून आणि जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करावा. हा पंथ मजबूत होईल, समाज मजबूत होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Web Title :-  PM Narendra Modi | pm modi targets opponents over investigative agencies action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Pankaj Singh | अजित पवारांचे रेकॉर्ड भाजपच्या या आमदारानं मोडलं, जाणून घ्या

 

TCS Share Buyback | खुली झाली 18000 कोटीची ऑफर, भाग घ्यावा का; अगोदर जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

 

RBI FD Rules Changed | आरबीआयने एफडीचे बदलले नियम ! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान